पुणे जिल्हा अखिल स्तरीय महा–ई सेवा व आधार केंद्र संघटनेची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न


नवीन कार्यकारिणी जाहीर, तालुका अध्यक्षांना नियुक्तीपत्रांचे वितरण

आज दि. २ नोव्हेंबर :पुणे जिल्हा अखिल स्तरीय महा–ई सेवा व आधार केंद्र संघटनेची जिल्हा बैठक आज पुण्यात अत्यंत उत्साहात पार पडली.या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच तालुका अध्यक्षांना संघटनेच्या वतीने नियुक्तीपत्रांचे वितरण करून संघटनेच्या कार्याला नवी गती देण्यात आली.

बैठकीचे अध्यक्षस्थान : जिल्हा अध्यक्ष *विजय मोहिते यांनी भूषविले. यावेळी जिल्हा सचिव भिमराव आठवले, राज्य प्रतिनिधी महाधन उघडे, राज्य संघटक प्रमुख योगेश रांधवण, आणि राज्य निरीक्षक ॲड. किशोर अडसूळ हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील कड यांनी उत्तमरीत्या केले, तर आभार प्रदर्शन विशाल कुलकर्णी यांनी केले.

बैठकीदरम्यान प्रमोद पानसरे आणि राज गायकवाड* यांनी उपस्थितांना संघटनेच्या संघटनात्मक बळकटी, डिजिटल पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी खालीलप्रमाणे अध्यक्षांची घोषणा करण्यात आली —

हवेली –विशाल कुलकर्णी, पुणे शहर – निखिल पालकर, दौंड – किरण काकडे, बारामती – प्रमोद पानसरे, इंदापूर – प्रदीप ताटे, भोर – सूर्यकांत माने, मावळ – अशोक मानकर, शिरूर – उमाकांत पांडे, पुरंदर – दत्तात्रय वाघमारे, जुन्नर – ॲड. संजय उकिर्डे, खेड – संदीप मेदगे, वेल्हा – समीर कांबळे, मुळशी – सुहास शेंडे, लोणी काळभोर अप्पर – राज गायकवाड. (आंबेगाव व पिंपरी चिंचवड पद रिक्त)

बैठकीत शासनाकडून केंद्र चालकांची पिळवणूक, शासनाकडून मिळत असलेली दुटप्पी वागणूक तसेच संघटनेच्या भावी योजना, सदस्य नोंदणी, ई-सेवा केंद्रांचे सक्षमीकरण आणि शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत चर्चा झाली.

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही, संघटनात्मक ऐक्य आणि डिजिटल भारताच्या संकल्पनेला बळकटी देणारा ठरला.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!