“सरकारला महसूल हवा की जनतेचे प्राण..? ‘नशामुक्त भारत’ अभियानाचा सरकारला जाहीर सवाल!”
मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार संपादक :
“नमस्कार !.. ‘नशामुक्त भारत अभियाना’च्या या कोअर कमिटीत जमलेल्या माझ्या तमाम रणमदांचे मी सहर्ष स्वागत करतो! आजचा हा मेळावा म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवणे नव्हे, तर समाजाला लागलेल्या ‘व्यसनासुरा’चा कोथळा बाहेर काढण्यासाठी आम्ही पुकारलेले हे एक खणखणीत धर्मयुद्ध आहे!
आमचे मार्गदर्शक आणि प्रेस मीडियाचे ‘सेनापती’ मुख्यसंपादक मा. श्री. मेहबूब सर्जेखान सर यांच्या धैर्याचे कौतुक करावे तितके थोडेच! अहो, आजच्या ‘मिंध्या’ पत्रकारितेच्या काळात, या सामाजिक कर्करोगावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचे धाडस फक्त सर्जेखान सरांसारखा एखादा व्याघ्रच करू शकतो! आणि या युद्धात आता निर्भीड पत्रकार श्रीकांत कांबळे आणि सुनील पाटील यांची तोफ डागली जाणार आहे! अहो, श्रीकांत आणि सुनील यांसारखे निर्भीड पत्रकार जेव्हा लेखणीची तलवार उपसतात, तेव्हा भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. त्यांच्या सहभागामुळे या अभियानाला आता एक ‘झणझणीत’ धार प्राप्त झाली आहे!
या मोहिमेत आमच्या दिमतीला डॉ. सलीम आळतेकर सर आणि डॉ. पांडुरंग कदम सर हे दोन ‘ब्रह्मास्त्र’ आहेत. अनुभवाचं तडाखेबंद गाठोडं पाठीशी असलेले हे दोन धन्वंतरी सोबत असताना यमराजालाही दोन पावलं मागे हटावं लागेल! तुमच्या ज्ञानाचा हा डोस या तरुण पिढीला आज संजीवनीसारखा ठरणार आहे.
आमचे अभिनेते मांगुरे सर! अहो, २ जानेवारीला ‘रपाटा’ चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा जो ‘रपाटा’ व्यसनी लोकांच्या कानाखाली लगावला आहे, त्याने झोपलेला समाज जागा झालाच पाहिजे! पडद्यावरचा सामाजिक संदेश प्रत्यक्ष मैदानात उतरवणारे मांगुरे सर म्हणजे कलेचा आणि कर्तव्याचा एक सुंदर संगमच! तर आमचे झाकीर हुसेन नालबंद हे डिजिटल युगाचे विश्वकर्मा आहेत, जे या अभियानाचा हुंकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतील.
पण आमचा खरा सवाल या सरकारला आहे! अहो, हे सरकार म्हणजे ‘तोंडाला पानं पुसण्याचा’ प्रकार आहे! सिगारेटच्या पाकिटावर ‘मरण’ लिहायचं आणि दुसरीकडे त्याचे कारखाने जोरात चालवायचे? हा कसला दांभिकपणा? सरकार फक्त किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारते, पण ज्या कारखान्यातून हे विष बाहेर पडतंय, त्या उत्पादनावर थेट बंदी घालायची तुमची हिंमत का होत नाही? अहो, मुळावर घाव घालण्याऐजी फांद्या छाटण्याचं हे सरकारी नाटक आता बंद करा! जोपर्यंत तुम्ही उत्पादनावर बंधन घालत नाही, तोपर्यंत ही विषवल्ली फोफावतच राहणार! सरकारला स्वतःच्या तिजोरीची काळजी आहे, पण गोरगरिबांच्या घराची राखरांगोळी होत आहे त्याचे काय? महसूल महत्त्वाचा की माणसाचा प्राण?
जोपर्यंत आमचा तरुण स्वतःहून ही ‘विषाची प्याली’ नाकारत नाही, तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही. **’समर्थ सोशल फाउंडेशन’**च्या माध्यमातून मी दंड थोपटून सांगतो की, या कार्यात आम्ही रक्ताचे पाणी करू! व्यसनांच्या आगीत होरपळणारी कुटुंबे वाचवण्यासाठी आता आम्ही मागे हटणार नाही!
चला, या व्यसनासुराचा अंत करण्यासाठी सज्ज व्हा! जय हिंद, जय महाराष्ट्र!”
अधिक माहितीसाठी संपर्क :
अनिस : जमादार :+91 77981 09612


























