सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात डॉ. निकाळजे यांच्या निवडणूक विषयक पुस्तकाचा समावेश…

प्रेस मीडिया लाईव्ह
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या अभ्यास मंडळाने नुकत्याच मान्यता दिलेल्या व जाहीर केलेल्या एम. ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमाच्या संदर्भ पुस्तकांच्या यादीमध्ये डॉ. तुषार निकाळजे यांच्या “भारतीय निवडणूक प्रणाली- स्थित्यंतरे व आव्हाने” या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे.

पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया व इलेक्टोरल पॉलिटिक्स इन इंडिया या दोन विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये डॉ. निकाळजे यांच्या या पुस्तकाचा संदर्भ पुस्तक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
Views: 22



























