डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी तर्फे सत्कार आणि दिग्गजांचे आशीर्वाद ; गोरेगावात रंगली खानदानी मैफल!


लोकसभेचे सभापती जगदंबिका पाल, नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अशफाक खान यांच्या कन्येचा शाही निकाह सोहळा संपन्न

 

मुंबई/ अहो, काय तो थाट आणि काय तो सोहळा! काल मुंबईच्या गोरेगावस्थित एसआरपीएफ (SRPF) मैदानावर डोळ्यांचे पारणे फेडणारा एक ‘शाही’ विवाहसोहळा संपन्न झाला. निमित्त होतं— वेस्टर्न इन्फ्राबिल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे भाग्यविधाते मिस्टर अशफाक खान साहेब यांच्या सुविद्य कन्येचा निकाह  काल संध्याकाळी ठीक सात वाजता गोरेगावच्या त्या विस्तीर्ण मैदानात जणू प्रत्यक्ष इंद्रपुरीच अवतरली होती. खान साहेबांच्या शब्दाचा मान राखून उभ्या हिंदुस्थानातील राजकारणी, बडे उद्योगपती आणि समाजधुरिणांची अशी काही अलोट गर्दी जमली होती की, जणू काही ‘मिनी संसद’च तिथे भरली आहे असा भास होत होता !

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते लोकसभेचे पाचव्या क्रमांकाचे सन्माननीय सभापती श्री. जगदंबिका पाल साहेब. विशेष म्हणजे, पुण्याच्या ‘डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी’च्या वतीने वहाब शेख, मशकूर अहमद शेख, अबरार सय्यद, अमान कुरेशी आणि ‘मुस्लिम बँक’ तसेच ‘पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन’चे धडाडीचे संचालक श्री. मोहम्मद गौस ऊर्फ बबलू सय्यद साहेब यांनी पाल साहेबांचा जंगी सत्कार करून स्नेहाचा वर्षाव केला. याच सोहळ्यात माजी खासदार उबेदुल्ला खान आझमी साहेब यांचीही उपस्थिती लाभली होती, त्यांच्याशी झालेल्या विशेष भेटीगाठींनी सोहळ्याची रंगत अधिकच वाढली.

राजकारणातील दोन दिग्गज खेळाडू— नवाब मलिक साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब यांनीही हजेरी लावून वधु-वरांना भरभरून शुभाशीर्वाद दिले. आझम कॅम्पसच्या विश्वस्तांसह अनेक सामाजिक क्षेत्रातील प्रभृतींची उपस्थिती ही अशफाक खान साहेबांच्या अफाट जनसंग्रहाची पावतीच होती. हा केवळ एक विवाहसोहळा नव्हता, तर ते खान साहेबांच्या स्नेहाचं आणि मित्रप्रेमाचं जिवंत दर्शन होतं. गोरेगावच्या मैदानात रात्री उशिरापर्यंत अत्तराचा दरवळ आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. पाहुणचाराचा तो रुबाब पाहून प्रत्येकजण तृप्त होऊन बाहेर पडत होता. धन्य तो सोहळा आणि धन्य तो खानदानी पाहुणचार..!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!