रुग्ण सेवा हेच आमचे ध्येय :- डॉ महेश कुदळे.

देहुरोड दि.:- समाजांचे ही काही देणे असते हे ध्येय समोर ठेवून देहुरोड येथील सुप्रसिद्ध आधार रुग्णालयाचे १६ व्वा वर्धापनदिनानिमित्त दहा दिवसांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे हे शिबिर १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत २४ तास हे आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे यामुळे नागरिकांना याच लाभ मिळणार आहे . या शिबिरात पॅथोलाॅजी, एक्सरे, ईसीजी, रक्त लघवी व इतर सेवेवर ५०% सवलत देण्यात आले आहे यामुळे या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे.
यात सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री सहायता नीधी अंतर्गत हदयशस्रक्रिया साठी मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे हदयशस्रक्रियेवर दहा हजार रुपये ची विशेष सवलत रुग्णालयाचे वतीने देण्यात आले आहे. या मानवता उपक्रमामुळे मुळे देहुरोडच्या परिसरातील लोकांना कमी सवलती मध्ये दर्जेदार उपचार मिळत आहे. आरोग्य तपासणी शिबिर सुरू झाल्यापासून आता पर्यंत शंभरहून अधिक बाह्यरुग्णांनी लाभ घेतला असून या शिबिरात हदयशस्रक्रियेवर दहा लोकांनी लाभ घेतला आहे तर महात्मा फुले योजना अंतर्गत बावीस लोकांनी लाभ घेतला आहे महात्मा फुले योजना सुरू झाल्यापासून आता पर्यंत ७० ते ८० लोकांनी हदयशस्रक्रियेचा लाभ घेतल्याचे रूग्णालयाचे प्रमुख डॉ महेश कुदळे यांनी माहीत देताना दिली. या आरोग्य तपासणी शिबिराचे जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आधार रुग्णालयाचे डॉ महेश कुदळे गणेश राऊत व संचालक मंडळाने केले आहे .


























