५६” आणि ६०” यंत्रमाग मशिनरीसाठी वाढती मागणी – जुन्या पावरलुम बाजारात तेजीत!


५६” आणि ६०” यंत्रमाग मशिनरीसाठी वाढती मागणी – जुन्या पावरलुम बाजारात तेजीत!

इचलकरंजी तसेच परिसरातील यंत्रमाग उद्योग पुन्हा एकदा चैतन्याच्या मार्गावर दिसत आहे. जुनी पावरलुम मशिनरी खरेदी-विक्री बाजारात सध्या प्रचंड हालचाल सुरू झाली असून, विशेषतः ५६ इंची आणि ६० इंची यंत्रमाग मशिनरींना मोठी मागणी निर्माण झाली आहे.

कापड बाजारातील मागणी वाढ, स्थिर सुत दर आणि दिवाळीनंतर वाढलेली उत्पादन क्षमता यामुळे कारखाने पुन्हा दोन्ही (शिफ्ट) सुरू करून ६०/%ते ७० % कार्यरत झाले आहेत. यामुळे स्थानिक तसेच बाहेरील राज्यांतील व्यापाऱ्यांकडून जुन्या मशिनरीसाठी चांगली मागणी येत आहे.

तेजी–मंदीच्या खेळातही यंत्रमाग उद्योगाने स्वतःची ताकद टिकवून ठेवली आहे. अनेक कारखानदारांनी मशिनरीचे पुनरुज्जीवन करून उत्पादन वाढवले असून, काहींनी नवीन मशिनरीऐवजी जुनी पण कार्यक्षम यंत्रे विकत घेण्याकडे कल दाखवला आहे. उद्योगातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, “दिवाळीनंतरचे बाजार वातावरण सकारात्मक असून, मागणी कायम राहिली तर यंत्रमाग क्षेत्राला पुढील काही महिने ‘अच्छे दिन’ राहतील.”


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!