निरोगी शरीर, निरोगी मन!” तळसंदे हायस्कूलमध्ये आरोग्य शिबिराचा उत्साह; बी.एड. छात्राध्यापकांचा स्तुत्य उपक्रम


“निरोगी शरीर, निरोगी मन!” तळसंदे हायस्कूलमध्ये आरोग्य शिबिराचा उत्साह; बी.एड. छात्राध्यापकांचा स्तुत्य उपक्रम

तळसंदे : श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.), पेठ वडगाव येथील बी.एड. भाग दोन (सेमिस्टर तीन) मधील छात्राध्यापकांनी आपल्या आंतरवासिता (इन्टर्नशिप) टप्पा क्रमांक दोन अंतर्गत तळसंदे हायस्कूल येथे दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन केले.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे आणि शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी चांगल्या सवयी विकसित करणे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळसंदे हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. ए. डी. कर्णिक होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय आनंद पाटील व सौ. मोहिनी ढाले उपस्थित होते. तसेच पेठ वडगाव बी.एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सौ. आर. एल. चौगुले-निर्मळे यांची विशेष उपस्थिती लाभली.

शिबिरादरम्यान तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, नियमित व्यायाम, परिसर स्वच्छता आणि मानसिक आरोग्याची निगा राखणे या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. *“निरोगी शरीर, निरोगी मन”* ही संकल्पना मांडत आरोग्य ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असा मोलाचा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला.

सदरील उपक्रमास बी.एड. कॉलेजचे प्रा. श्री. एस. के. सोरटे आणि प्रा. सौ. व्ही. आर. पोळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिरामध्ये हायस्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या आरोग्य शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!