इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन

दि.२६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आज बुधवार दि.२६ नोव्हेंबर रोजी इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. त्याचबरोबर महानगरपालिका इमारतीच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणेत आले.
याप्रसंगी उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त विद्या कदम सहा.आयुक्त रोशनी गोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत , लेखा परीक्षक केशव काटे, शिक्षण अधिकारी बी.एम. कुंभार, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, प्रशासन अधिकारी इरफान पटेल, सहा.आयुक्त सुनील शिंदे, सहा.आयुक्त नितिन बनगे, सहा.आयुक्त धनंजय पळसुले, सहा.आयुक्त रामचंद्र कांबळे,सहा. आयुक्त बेबी नदाफ, सहा. कर संकलन अधिकारी दिपक खोत, क्रीडा अधिकारी संजय शेटे , सदाशिव जाधव, प्रदीप झंबरी यांचेसह प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क अधिकारी
इचलकरंजी महानगरपालिका































