आता नाही तर परत नाहीच नाही : अखिल भारतीय धोबी समाज चे उपाध्यक्ष दत्तात्रय बन्नू


शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील लिंगायत व मराठा धोबी समाजाची बैठक ३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता कल्लेश्वर मंदिर मध्ये पार पडले.
या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय रेल्वे समाजाचे उपाध्यक्ष दत्तात्रय बन्ने होते , दत्तात्रय बन्ने आपल्या विचार बैठकी समोर मांडत असताना पुढे म्हणाले की आपला परीट धोबी समाज १९६० सालाच्या पूर्वी एस सी च्या सवलती घेत होता परंतु १९६० नंतर आपल्या धोबी समाजाच्या एससीच्या सवलती काढून घेण्यात आल्या या मागणी करता अनेक संघटनाने उपोषण धरणे आंदोलन जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी निवदेन देण्यात आले त्याचबरोबर महाराष्ट्रातील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धुणे धुण्याचे आंदोलन देखील करण्यात आले. आपली मागणी नवीन नाही आपण आपला हक्काचे आरक्षण काढून घेतल्याबद्दल आपण आपला अधिकार मागत आहोत आपण या सरकारकडे भीक मागत नाही त्याकरीता आपण आपल्या समाजाच्या वतीने व अन्य संघटनेच्या वतीने २५ नोव्हेंबरला सविधान चौकामध्ये धरणे आंदोलन साखळी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून हजारो संख्येने कार्यकर्त्यांनी जाण्याचा निर्धार केला आहे. प्रदेश उपाध्यक्ष आनंदराव शिंदे आपले विचार मांडत असताना पुढे म्हणाले की मागील काही वर्षांपूर्वी या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समाजाला गाजर दाखवण्याचे काम केले आहे
बंधुनो मुख्यमंत्री असताना संत गाडगे महाराज यांच्या नावाने महामंडळ घोषित केले परंतु त्याच्यामध्ये त्याने काहीच निधी दिला नाही फक्त मोठमोठ्या पोकळ घोषणा करून धोबी समाजाला अंधारात ठेवले आहे म्हणून या सर्व मागण्या करीता आपण
नागपूर येथे आंदोलनामध्ये भाग घेऊन हे आंदोलन यशस्वी करायचे आहे आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. या आंदोलनाची दिशा ठरवण्याकरीता म्हणून हि प्राथमिक बैठक असून आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो.
या बैठकीस समाजाची विभागीय प्रमुख सागर परीट जिल्हा अध्यक्ष अभिजीत सांगावकर कृष्णकांत भालकर युवा जिल्हा अध्यक्ष प्रवीण परिट व तसेच सिद्धाप्पा राजू परीट भिकाजी परीट श्रीकांत बन्ने संजय परीट नाना बन्ने भैरू कदम बापूसाहेब परीट दीपक परीट गोपाल मडिवाळ महादेव कदम विशाल कदम प्रमोद परीट हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
बैठक यशस्वी करण्याकरिता शिरोळ परिट समाज चे तालुका अध्यक्ष मनोहर बन्ने यांनी परिश्रम घेतला



























