संविधान सन्मान संघ देहूरोड, यांच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर. 


राष्ट्रीय कार्यक्रमात देहूरोड पंचक्रोशीतील लोकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे संविधान सन्मान संघच्या वतीने आवाहन .

 

देहूरोड  प्रतिनिधी :- ७६ व्वा भारतीय संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन संविधान सन्मान संघ यांच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. सकाळी १०:०० वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास दिप धुप पुष्पहार अर्पण सकाळी १०:१५ मिनिटाला संविधान वाचन सकाळी १०:३० ते ११:०० देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटल मध्ये रुग्णांना फळे व मिठाई वाटप दुपारी ३:०० ते ६:०० दोन ढोल ताशे पथक व हलगी वाद्य सह भव्य रॅली, ६:०० ते ७:०० मान्यवरांचे स्वागत सत्कार सायंकाळी ७:०० ते ८:०० मान्यवरांचे मनोगत ८:०० ते ९:०० विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचे सन्मान चिन्ह प्रदान ९:०० ते १० स्नेह भोजन व कार्यक्रमांची सांगता होणार आहे. सत्कार मुर्तीचे जाहीर झालेले नाव पुढीलप्रमाणे १)सतिश ज्ञानदेव राऊत (उपजिल्हाधिकारी) २)ईश्वरसेठ अगरवाल (संस्थापक अध्यक्ष नारायणीदेवी चॅरिटेबल ट्रस्ट ) ३) डॉ श्रीनिवास चाटे ( वैद्यकीय अधिकारी कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटल) ४) डॉ यामिनी अडबे (सहा. वैद्यकीय अधिकारी कॅन्टोन्मेंट बोर्ड) ५) महावीर शेठ बरलोटा ( प्रसिद्ध उद्योजक) ६) कांतीशेठ पारेख (प्रसिद्ध व्यापारी) ७) रामरतन रजत ( रेल्वे सहा. स्टेशन मास्तर) ८) मदनशेठ सोनिगरा ( मा. उपाध्यक्ष कॅन्टोन्मेंट बोर्ड) ९) गुरूमितसिंग रत्तू (अध्यक्ष गुरूद्वारा समिती देहूरोड) १०) संतोष म्हस्के ( सामाजिक कार्यकर्ता व उद्योजक) ११) करण ताटे ( प्रोफेसर व इंजिनिअर) १२) संजय शेंडे ( सामाजिक कार्यकर्ता) १३) राम शांतमल सोनकांबळे ( प्रसिद्ध उद्योजक) १४) बाळासाहेब आडसुळ (महाराज) (प्रसिद्ध उद्योजक) १५) तुकाराम डावरे ( जेष्ठ समाज सेवक) असे पुरूस्कार झालेले मान्यवरांचे नाव आहेत. हा कार्यक्रम दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वामी विवेकानंद चौक देहूरोड उड्डाण पूल खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्वानी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे संविधान सन्मान संघ उत्सव कमिटीचे अध्यक्ष मोझेस दास यांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!