नशा सोडा, सन्मान मिळवा..! ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ची ऐतिहासिक गर्जना: 


नशा सोडा, सन्मान मिळवा..! ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ची ऐतिहासिक गर्जना:

ज्या पुण्याच्या मातीने देशाला क्रांतीचा विचार दिला, त्याच पुण्यनगरीतून आज एका नव्या सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले गेले आहे! जागतिक पातळीवर ‘क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये आपली मोहोर उमटवणाऱ्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ या आघाडीच्या वृत्तसंस्थेने आता विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणाईला वाचवण्यासाठी ‘नशा मुक्त भारत अभियान’ पुकारले आहे.

संपादकांचे ठाम प्रतिपादन:
“आमच्या या पवित्र कार्यात कोणत्याही प्रकारचे ‘राजकारण’ चालणार नाही! हे अभियान केवळ आणि केवळ भारत मातेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तरुणाईला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आहे. समाज वाचवणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे!”

— मेहबूब सर्जेखान (मुख्य संपादक, प्रेस मीडिया लाईव्ह)

नायकाचा निर्धार: पडद्यावरचा अभिनय आणि आयुष्यातला संघर्ष.!

इचलकरंजीचे सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते महमद रफीक मांगुरे सर यांनी या अभियानात स्वतःला झोकून दिले आहे. एक कलाकार जेव्हा समाजाच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी उभा ठाकतो, तेव्हा ती खरी ‘हिरोईझम’ असते!

अभिनेते मांगुरे सरांची ग्वाही:
नशा मुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी मी माझ्या चित्रपटाचे काम सांभाळून सदैव या कार्यासाठी आपल्या सोबत आहे. समाजातील तरुणाईला वाचवणे हे चित्रपटाच्या भूमिकेपेक्षाही श्रेष्ठ कर्तव्य मी मानतो!”
— महमद रफीक मांगुरे (प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते)
सांगलीच्या ‘आधार’ची मिळाली साथ.!

या महायज्ञात आता सांगलीची ताकदही एकवटली आहे. सांगली येथील ‘आधार मधुमेह व नशा मुक्त केंद्र’ या मोहिमेत खांद्याला खांदा लावून सामील झाले आहेत. ज्या तरुणांना या व्यसनाच्या दलदलीतून बाहेर पडायचे आहे, त्यांच्यासाठी हे केंद्र आता एक आशेचा किरण ठरत आहे. केवळ भाषणे नाही, तर प्रत्यक्ष उपचार आणि समुपदेशन करून ही टीम आता मैदानात उतरली आहे.

आता सरकारला आमची साद!
केवळ संस्था आणि व्यक्ती लढून हा विळखा सुटणार नाही. या सामाजिक युद्धात शासनाचा वाटा मोलाचा आहे. ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ आणि या मोहिमेत सामील झालेल्या हजारो हातांनी आता सरकारलाही विनंती केली आहे की, या पवित्र कार्याची गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला योग्य ते सहकार्य करावे. जेव्हा शासन आणि प्रशासन अशा निस्वार्थी मोहिमेच्या पाठीशी उभे राहील, तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने व्यसनांच्या साखळदंडातून मुक्त होईल!
तरुणांनो, व्यसन नव्हे, बापाचा आधार व्हा!

आजचा तरुण चैनीच्या आणि नशेच्या विळख्यात अडकून स्वतःचे आयुष्य तर राख करत आहेच, पण त्यासोबतच आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांच्या स्वप्नांची होळी करत आहे. विशेष म्हणजे, जे तरुण या अंधकारातून बाहेर पडण्याचा निश्चय करतील, त्यांना समाज वाळीत टाकणार नाही; उलट ‘प्रेस मीडिया लाईव्ह’तर्फे त्यांचा जाहीर सन्मान करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल.

बुद्धिवंतांची वज्रमूठ..!

हे अभियान आता केवळ एका संस्थेचे राहिले नसून, त्यात पत्रकार, डॉक्टर, समाजसेवक आणि वकिलांची मोठी फौज उभी राहिली आहे. ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या या ऐतिहासिक पाऊलामुळे आता नशा मुक्तीच्या वणव्याला सुरुवात झाली असून, “भारत व्यसनमुक्त होणारच!” हा विश्वास आता जनमाणसात निर्माण झाला आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!