दुःखद बातमी : माजी नगरसेवक ॲड. अय्युबभाई शेख यांच्या मातोश्रींचे निधन


दुःखद बातमी : माजी नगरसेवक ॲड. अय्युबभाई शेख यांच्या मातोश्रींचे निधन

पुणे : मुस्लिम बँकेचे व्हाइस चेअरमन आणि माजी नगरसेवक ॲड. अय्युबभाई शेख यांच्या मातोश्रींचे आज, ६ मे २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे येरवडा परिसरात शोककळा पसरली आहे.

अंतिम विधींचा तपशील:

जनाजाची नमाज : आज (बुधवार, ६ मे) मगरीबच्या नमाज नंतर, मदिना जामा मस्जिद, हुसेनशाह बाबा दरगाह (मेंटल हॉस्पिटल जवळ), येरवडा येथे पार पडेल.

दफनविधी (तदफीन) : नमाजे जनाजा झाल्यानंतर जय जवान नगर कब्रस्तान, येरवडा येथे त्यांना सुपूर्द-ए-खाक करण्यात येईल.

मुस्लिम जमात हुसेनशाह बाबा ट्रस्टच्या वतीने मरहुमा यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!