श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठ वडगाव महाविद्यालयामध्ये इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न झाला.

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगाव महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या छात्राध्यापकांसाठी *इंडक्शन प्रोग्राम* राबविण्यात आला.शनिवार,दि.1 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वप्रथम परिपाठाने दिवसाची सुरुवात झाली.या उपक्रमामध्ये प्रथमतः प्राचार्यांकडून सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व सर्वांना बी.एड. अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर सर्व छात्राध्यापकांची मुलाखत घेण्यात आली. त्याचबरोबर सर्व स्टाफनेही आपली ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी आपले नाव, गाव ,बी.एड.ला ऍडमिशन घेण्याचे कारण, आवडी-निवडी याविषयी आपले मत सांगितले. प्राचार्या डॉ. आर एल निर्मळे -चौगुले यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यामध्ये त्यांनी बी.एड. अभ्यासक्रमामध्ये कोणकोणत्या बाबी येतात व कोणकोणत्या बाबींचे अध्ययन करावे व शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये, क्षमता यांचे विकसन होण्यासाठी काय करावे हे सांगितले. त्यानंतर लगेचच प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अभ्यासक्रमाची ओळख करून देण्यात आली. नियोजित अभ्यासक्रमाची प्रा. चव्हाण व्ही.डी.यांनी माहिती दिली. प्रा. सावंत ए.पी. यांनी सेमिस्टर फर्स्ट मधील प्रॅक्टिकल ची ओळख करून दिली. प्रा. सोरटे एस. के. यांनी परीक्षा विषयी मार्गदर्शन केले.प्रा.दराडे टी.पी. यांनी स्कॉलरशिपविषयी माहिती सांगितली. ग्रंथपाल चौगुले एस. एस. यांनी ग्रंथालया विषयी माहिती सांगितली. त्यानंतर एम. आय. एस. या सॉफ्टवेअरविषयी प्रा.सावंत ए.पी. यांनी माहिती दिली. दिवसभरात सर्व विद्यार्थ्यांनी बी.एड. अभ्यासक्रमातील सेमिस्टर एक मधील सर्व विषय, प्रात्यक्षिके, अंतर्गत परीक्षा, कार्यालयीन माहिती, ग्रंथालय माहिती या सर्वांविषयी माहिती प्राप्त केली.
या सर्व उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निर्मळे- चौगुले आर. एल., प्रा. चव्हाण व्ही.डी.,प्रा. सोरटे एस. के., प्रा. सावंत ए.पी., प्रा. दराडे टी.पी. यांचे मार्गदर्शन लाभले, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व छात्राध्यापक यांचे सहकार्य मिळाले.
महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष मा. विजयसिंह माने साहेब यांचेही या कार्यक्रमासाठी विशेष मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशाप्रकारे इंडक्शन प्रोग्रॅम या अंतर्गत विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये संपन्न झाले.



























