कोरोचीच्या मातीत ‘उपऱ्यांची’ पेरणी; निष्ठावंतांच्या नशिबी फक्त प्रतीक्षाच?


कोरोचीच्या मातीत ‘उपऱ्यांची’ पेरणी; निष्ठावंतांच्या नशिबी फक्त प्रतीक्षाच..?

श्रीकांत कांबळे ;
कोरोची जिल्हा परिषद मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाॅट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक ,यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांचे फोटो ,शुभेच्छा संदेश, विकास कामाची माहिती ,अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात झळकत असून उमेदवार मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मतदारापर्यंत आपण केलेल्या राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, सहकार, अशा विविध क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती पोहोचवण्याचे काम उमेदवार सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.

कोरोची जिल्हा परिषद मतदार संघात तारदाळ खोतवाडी व कोरोची या गावांचा समावेश असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालीना वेग आला असून या मतदारसंघात यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण लागू आहे .असे असताना भाजपकडून स्थानिक पातळीवरील इच्छुक उमेदवारांना संधी न देता बाहेरील किंवा आपल्याच घरातीलच उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवारांची डोकेदुखी बनली आहे.  सदर मतदारसंघात भाजप कडून अनेक अनुभवी, सक्षम व सक्रिय, महिला उमेदवार इच्छूक असून स्थानिक उमेदवारांना संधी मिळाली अशा प्रतिक्रिया मतदारातुन व्यक्त होत आहे.

ज्या बाहेरील किंवा आपल्याच घरातीलच उमेदवारी सांगणारे वरिष्ठ नेत्याकडून अनेक कोट्यावधी रुपयांची विकास कामे झालेली आहेत तसेच अनेक संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या मतदारांमध्ये चर्चा आहे

         ग्रामस्थ व मतदारामधून उपरा व बाहेरचा उमेदवार न देता तसेच स्थानिक उमेदवार मधील घराणेशाही उमेदवारी न देता सर्वसामान्या मधील एखादा उमेदवार द्यावा अशी मतदारातून चर्चां होतं आहे.    त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून उमेदवारी बाबत कोणती अधिकृत भूमिका स्पष्ट होते. उमेदवारी जाहीर झाल्या नंतर समजून येईल अशी मतदारातून चर्चां होतं आहे.


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!