राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांचा मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)या पक्षाला जागा सोडण्याची मागणी


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांचा मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)या पक्षाला जागा सोडण्याची मागणी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिनभाऊ खरात यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप यांना रिपाई (सचिन खरात गट)या पक्षाकडून पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकी मध्ये जागा सोडण्यासाठी पुणे शहर अध्यक्ष मा.राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश मुख्य संघटक मा.फिरोज मुल्ला (सर )यांच्या उपस्थिती मध्ये शिष्ट मंडळाकडून निवेदन देण्यात आले.

2025-2026 पुणे महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट या पक्षाच्या सक्षम उमेदवार म्हणून सौ. शकीलाताई फिरोज मुल्ला यांना प्रभाग क्रमांक 8, ब,औंध बोपोडी, ओ.बी.सी. महिला राखीव उमेदवार यांना देण्यात यावी अशी मागणी रिपाई सचिन खरात गट मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाकडे करण्यात आली

सौ. शकीलाताई फिरोज मुल्ला या सन 2007आणि 2017 साली ओ.बी.सी. महिला राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी दिग्ज उमेदवारांना चांगली लढत दिली होती आणि जनतेचे प्रश्न व स्थानिक समस्या मार्गी लावण्यासाठी मोर्चे आंदोलन करून प्रयत्न करीत आहेत तसेच शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अल्पसंख्यांक या विचार धारेवर काम करत असल्यामुळे संपूर्ण प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये चारच्या पॉनल सक्षम होऊ शकतो अशी माहिती पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांनी निवेदन देताना प्रशांतदादा जगताप यांना दिली

यावेळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राहुल वडमारे, वाहतूक आघाडी पुणे शहर अध्यक्ष बाबाहरी सोनवणे, पुणे शहर उपाध्यक्ष राजू कांबळे,महिला शहर अध्यक्षा सौ.वाहिदा शेख,छ. शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे, उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण, आदी कार्यकर्ते उपस्थित होते


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!