पुण्यात ‘तीच माहेर’चा अनोखा पॅटर्न! बुधवार पेठेतील ५१ उपेक्षित भगिनींना लाभली ‘अपना घर’ची मायेची ऊब


पुण्यात ‘तीच माहेर’चा अनोखा पॅटर्न! बुधवार पेठेतील ५१ उपेक्षित भगिनींना लाभली ‘अपना घर’ची मायेची ऊब

पुणे, दि. १६ जून  : लहानपणी ज्या अंगणात खेळलो, ज्या सावलीत वाढलो, ते हक्काचे माहेर सुटल्यावर अनेक महिलांच्या नशिबी केवळ उपेक्षा आणि विरंगुळा येतो. विशेषतः समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या बुधवार पेठेतील भगिनींच्या आयुष्यात तर ‘माहेरची माया’ हा केवळ एक सुकलेला, कोमेजलेला कप्पा ठरतो. जन्माचे सगळे बंध तुटून गेलेल्या आणि माहेरच्या प्रेमापासून, आधारापासून वंचित राहिलेल्या याच उपेक्षित भगिनींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी ‘अपना घर सामाजिक ट्रस्ट’ने पुण्यात मायेची एक आर्त साद घातली आहे.

महाराष्ट्रात प्रथमच राबविण्यात आलेल्या **“तीच माहेर”** या अत्यंत संवेदनशील आणि भावूक उपक्रमांतर्गत बुधवार पेठेतील ५१ माता-भगिनींना आदराने आणि सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.

**मायेची साडी अन् तुळशीचे रोपटे; कपाळावर कुंकू अन् डोळ्यांत आनंदाश्रू..!

केवळ कोरडी सहानुभूती दाखवून कोणाचे आयुष्य सावरत नाही, तर त्याला प्रत्यक्ष मायेची ऊब द्यावी लागते. याच भावनेतून या सोहळ्यात जेव्हा उपस्थित ५१ भगिनींना मानाची साडी आणि मिठाई देण्यात आली, तेव्हा अनेक भगिनींचे गळे दाटून आले. घरादाराचे मांगल्य आणि पावित्र्य टिकवून ठेवणाऱ्या तुळशीचे एक-एक रोपटे जेव्हा त्यांच्या हातात सोपवण्यात आले, तेव्हा त्यांच्या अंधारलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा आणि स्वाभिमानाचा एक नवीन किरण फुलून आला.

हा केवळ वस्तूंच्या वाटपाचा सोहळा नव्हता, तर ‘तुम्ही एकट्या नाही, हा अख्खा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’ हा जिव्हाळ्याचा विश्वास देणारा एक कृतज्ञता सोहळा होता. समाजाने कायम बाजूला सारलेल्या या भगिनींना मिळालेली ही आपलेपणाची जाणीव त्यांच्या मनाला सुखावून गेली.

**संवेदनशील मनांनी जोडला मायेचा धागा **

पुण्यातील काही संवेदनशील नागरिकांनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्र येत या कायक्रमाला मोठे बळ दिले. यामध्ये प्रणिता राठी, श्रद्धा राठी, अॅड. शंकर चव्हाण, अॅड. मंदार दाणवले, चंद्रकांत सूर्यवंशी व त्यांची टीम, डॉ. हेमंत कुमार, संतोष चौधरी, अलका गुंजाळ, मधुबाला मुथा आणि जयश्री घोडके यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत या भगिनींना माहेरच्या माणसासारखा आधार दिला.

अशा उपेक्षित आणि वंचित महिलांच्या आयुष्यात सन्मान, आपुलकी आणि मायेचा एक सुंदर, गोड क्षण निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य म्हणून पुढे आले पाहिजे, असे आवाहन अपना घर सामाजिक ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

ज्या समाजात स्त्रीला आदराचे स्थान देण्याची आपली संस्कृती आहे, तिथे अशा उपक्रमांची आज नितांत गरज आहे. ‘अपना घर’ ट्रस्टने सुरू केलेली ही मायेची पाऊलवाट उद्या प्रत्येक उपेक्षिताच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश आणो, हीच या निमित्ताने सदिच्छा!

#TeechMaher #ApnaGharSocialTrust #PressMediaLive #SocialInitiative #PuneNews #WomenEmpowerment #HumanityFirst #BudhwarPeth #SocialWork #Pune


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!