रसायनी कॉर्नर ते डिंपल कंपनी पर्यंतचा रस्ता डांबरीकरण रस्ता केव्हा होणार?


ग्रामपंचायत तुराडे यांनी दिले स्मरणपत्र मा. उपभियांता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.०१ पनवेल- रायगड यांना सुचित केले असून सुद्धा बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

प्रेस मीडिया लाईव्ह 

सुनील पाटील

रसायनी कॉर्नर ते डिंपल कंपनी पर्यंतचा रस्ता डांबरीकरण रस्ता केव्हा होणार? महत्वाचे बाब म्हणजे रसायनी रेल्वे स्टेशन तसेच तूराडे कष्टकरी नगर जुनी पोसरी डिंपल कंपनीकडून जाताना गुळसुंदे थोडक्यात या रस्त्यालगत बीपीसीएल कंपनी लागत असून तसेच ग्रामस्थांची वर्दळ कामगारांचे येणं जाणं आणि रसायनी रेल्वे स्टेशन कडे रसायनि परिसरातील कामगार वर्ग या नागरिकांचे रोजची वर्दळ चालू आहे तरी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामपंचायत तुराडे यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा हे जाणीवपूर्वक पूर्वक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असून आज ग्रामपंचायतला पनवेल तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्याची भाग पाडले आहे

उपरोक्त विषयान्वये आपणास सदरचे स्मरणपत्र पुन्हा आपणास देत आहोत. रसापनी कॉर्नर ते डिंपल कंपनी पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून मोठ-मोठे खड्डे पडलेले असून जाण्या-येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होऊन अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने सदर बाबा आपणास पत्र देऊन, फोन वरून वारंवार सांगून आणि प्रत्येक भेटून वेळोवेळी सांगून ही आपणाकडून सदर कामाबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक आम्हाला हि सदर कामाबाबत जाब विचारात आहे. हि सदर बाब आपणास निदर्शनास आणून दिली असता आपणाकडून कोणतेही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.

तरी या स्मरणपत्र द्वारा आम्ही आपणास असे कळवू इच्छीतो कि, सदर रस्ताच्या कामाची सुरुवात येत्या दिवसात जर झाली नाही तर आम्ही दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी रसायनी सावळा कॉर्नर येथे जनतेच्या रोषाला सामोरे जाऊन रस्ता रोको आंदोलन केले जाईल यांची नोंद घ्यावी. असे पत्र

तहसीलदार साहेब पनवेल पोलीस निरीक्षक रसायनी पोलीस ठाणे यांना देण्यात आले


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!