जो पर्यंत प्रभाग क्रमांक १६ चे सर्वांगिण विकास होत नाही तो पर्यंत कर वसुली करू नये :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शाहु फुले आंबेडकर विचारमंच ची मागणी ‌. 


लेखी आश्वासना नंतर तुर्तास आंदोलन मागे. 

देहुरोड दि. :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड चे किवळे येथील कर संकलन कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले नागरिकांनी आक्रोश करत समस्या मांडताना सांगितले की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विकास नगर किवळे येथे गार्डन       ( बगीचा ) नाही, तसेच मुलांना खेळण्यासाठी खेळाचे मैदान नाही, आज महिला घराबाहेर पडले तर महिलांना स्वच्छता गृह नाही तसेच पुरुष शौचालय देखील नाही, अनेक ठिकाणी रस्ते डांबरीकरण झालेले नाही, परंतु महापालिकेच्या वतीने दरवर्षी घरगुती मिळकत कर मात्र वसूल केला जातो कर जर भरले नाही तर घरा समोर दवंडी पिटुन कर वसुली केले जाते जर कर वसुली केले जाते तसेच लोकांना देखील सुख सुविधा उपलब्ध करून दिले पाहिजे असे ठामपणे भुमिका घेतली प्रभाग क्रमांक १६ विकास नगर किवळे रावेत मामुर्डी गावे हे १९९६ साली पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाले आहेत.
आज तब्बल २७ वर्षानंतर ही या भागात विकास काम झालेले नसल्याचे यावेळी सांगितले. महापालिकेच्या २०२३/ २५ आर्थिक वर्षात या प्रभागासाठी फक्त आठ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे हा निधी फार कमी असल्याचे उपोषण करणारे आंदोलनकर्त्यांचे सांगितले , यावेळी शास्तीकर माफीचा नागरिकांना नेमकी किती लाभ मिळाला याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली, यावेळी आंदोलकांनी जोपर्यंत प्रभाग क्रमांक १६ च्या सर्वांगीण विकास होत नाही तोपर्यंत कर वसुली थांबवावे अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली, या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गौतम गायकवाड, जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण, जेष्ठ नेते दिलीप कडलक, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कदम, राजेंद्र महाले, बापूसाहेब गायकवाड, विशाल साळवी, पालाराम धुमडा, भास्कर म्हेत्रे, किरण कांबळे, प्रकाश गायकवाड, मेघराज तंतरपाळे ,अजय बखारिया, उद्योजक दिलीप दांगट रोहित माळी अशोक मुराई, रवी कडू, बाळासाहेब झंझाट, अमित कांगडा व जय हिंद बँकेचे संचालक धनाजी विनोदे सामाजिक कार्यकर्ता शांताराम भोंडवे, बाळासाहेब मराठे, भाजपाचे मोहन राऊत, आणि गोरख तरस आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी जो पर्यंत लेखी स्वरूपात आश्वासन दिले जात नाही तो पर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम बसुन राहणार अशी भुमिका घेतली तेव्हा कर संकलन कार्यालयाचे अधीक्षक राजेश बांदल आणि वरिष्ठ लिपिक कांचन भवारी यांनी आंदोलन कार्यकर्त्यांना लेखी उत्तर दिल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व शाहु फुले आंबेडकर विचारमंच चे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी जर दिलेल्या अश्वानपुर्ती न केल्यास या पेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असे ही ठणकावून सांगितले आहे.

48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!