पिंपरी चिंचवड महिला युवक काँग्रेसच्या वतीने डॉ मुंडे यांना श्रद्धांजली रक्षकच भक्षक झाले तर सर्व सामान्यांना न्याय कुठे. 


सरकार झोपले आहे का?जो पर्यंत डॉ संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत लढा सुरू राहणार 

पिंपरी दि. :- संपुर्ण राज्यात चर्चेत असलेल्या डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण गाजत आहे आणि कायद्याचे फटफजिती होत आहे पिंपरी चिंचवड राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रोश करत कायद्यावर बोट ठेवून पिंपरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर निषेध व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करून निषेध करण्यात आला आत्महत्या केलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या निधनाने संतापलेल्या पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात श्रद्धांजली अर्पण करताना घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

या श्रद्धांजली सभेत बोलताना महिला काँग्रेस अध्यक्षा सायली नढे यांनी पोलीस यंत्रणेवर थेट बोट ठेवले. त्या म्हणाल्या, ‘‘रक्षकच भक्षक झाले आहेत.. सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा? डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या ही केवळ वैयक्तिक दुर्घटना नव्हे, तर राज्यातील कायद्याच्या राज्याची दयणीय अवस्था आहे. महाराष्ट्रात हगवणे प्रकरणासारख्या घटनांनी पोलीस दलाची विश्वासार्हता संपली आहे. इतर प्रकरणांमध्येही न्याय मिळत नाही, मग सामान्य नागरिक कुठे जाणार?’’ यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. मुंडे यांच्या फोटोसमोर दोन मिनिटे मौन पाळले आणि ‘न्याय मिळेपर्यंत लढू!’च्या घोषणा दिल्या. युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले यांनी सांगितले, ‘‘ही घटना राज्य सरकारच्या निष्क्रियतेचे प्रतीक आहे. फलटणसारख्या घटना वारंवार घडतात, पण दोषींना शिक्षा होत नाही. आम्ही रस्त्यावर उतरू आणि न्यायाची लढाई लढू.’’

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनोज कांबळे यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘‘डॉ. मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. राज्यात अशा घटना वाढत आहेत, सरकार झोपले आहे का?’’ यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनोज कांबळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, महिला अध्यक्षा सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, संदेश नवले, अजय खराडे, चंद्रकांत लोंढे, आशा भोसले, प्रियंका सगट, प्रज्ञा जगताप, स्वाती शिंदे, सौरभ शिंदे, रोहित शेळके, जय ठोंबरे, तन्मेश इंगवले, ,गौरव चौधरी ,विशाल कसबे, प्रतीक जगताप जमीर शेख ,मयूर रोकडे, आदित्य जाधव,अनिकेत सोनवणे,शबाना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!