बेडकिहाळ शमणेवाडी येथील काही दिवसांपासून अडवलेली ऊस वाहतूक वाहने सोडली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दराबाबत गेल्या सहा दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु आहे. याचे पडसाद बेडकिहाळ सर्कल परिसरातील शमनेवाडी ते सदलगा या प्रमुख मार्गावर महाराष्ट्रातील साखर कारखान्याकडे जात असलेली सुमारे १०० हून अधिक ऊस वाहतूक करणारी वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रोखण्यात आली होती. मात्र सदर ऊस वाळत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सदर वाहने गुरुवारी सोडून देण्यात आली.
दरम्यान सदर आंदोलन मात्र सुरुच राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवार जवाहर साखर कारखान्याचे संचालक, पोलीस प्रशासन, कन्नड संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रोखलेले ट्रक व ट्रॅक्टर सोडण्याचा निर्णय दुपारी घेतला, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राजू खिचडे यांनी सांगितले.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाबासाहेब खोत, रमेश पाटील,अजित कोन्नुरे, भरत खोत, मंजू भानुसे, विजय मडिवाळ, अभय पाटील, भारत अम्मानवर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.































