जेथे असाल तेथून २५ डिसेंबरला ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे या :- संघपाल शिरसाट.
देहुरोड दि. :- भारतातुन २५०० वर्षापूर्वी भारतातुन लोप झालेला बौद्ध धम्माची पुन्हा निर्मिती करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदिक्षा घेण्याच्या दोन वर्षे अगोदर म्हणजेच २५ डिसेंबर १९५४ साली ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते भारतातील पहिली तथागत गौतम बुद्धाची मूर्ती स्थापन करून इतिहास निर्माण केला .
या ऐतिहासिक धम्मभूमी वर जागतिक बौद्ध धम्मपीठ व्हावे, भव्य दिव्य असे जागतिक स्तरावरील बुद्धीविहार व्हावे असे महास्वप्नं डॉ. बाबसाहेबांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले होते, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांपासून बुद्धविहार कृती समिती च्या वतीने संस्थापक अध्यक्ष भीमपुत्र टेक्सासदादा गायकवाड यांचे मार्गदर्शनात अष्टप्रधान मंडळ, धम्मभूमी सुरक्षा समिती हे अथक प्रयत्नातून पूर्णत्वास जात आहे , दीक्षाभूमी, चैत्यभूमी व धम्मभूमी या त्रिवेणी संगम असलेला विहाराचा प्लॅन मंजूर करण्यात आला आहे,
विहाराचे विकास काम प्रगतीपथावर चालू आहे, याचं धम्मभूमी वर भारतातून जेथे ही भिमसैनिक, उपासक,उपसिका असतील तेथून त्यांनी २५ डिसेंबरला ऐतिहासिक धम्मभूमी वर आलेच पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आपल्या धम्मभूमी वरील भाषणांमधून बोलले होते त्यानुसार भिमसैनिकांनी २५ डिसेंबर २०२५ ला धम्मभूमी वर सालाबाद प्रमाणे बहुसंख्येने उपस्थित राहावे विदर्भ व मराठवाड्यातून रेल्वेने बिल्ले लावून मोफत येता येईल गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने २५ डिसेंबर ला निघायचे आहे अधिक माहिती करीता धम्मभूमी सुरक्षा समितीचे विदर्भ अध्यक्ष संघपाल सिरसाट अकोला भ्रमणध्वनी क्रमांक 9822374723 वर संपर्क साधावा असे आवाहन संघपाल शिरसाट यांनी केले आहे.































