इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक: राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न


इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक: राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न

प्रचारासाठी व्हिडिओ क्लिप्सला समितीची परवानगी अनिवार्य; तक्रारीसाठी हेल्पलाईन जाहीर

इचलकरंजी: इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुरुवारी (१८ डिसेंबर) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत शहरातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महत्त्वाचे मुद्दे आणि सूचना:

माहिती पुस्तिका उपलब्ध: निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती असलेली पुस्तिका महानगरपालिका प्रशासनाकडून इच्छुक उमेदवारांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अचूक अर्ज भरण्याचे आवाहन: उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र भरताना कोणतीही चूक होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्त पाटील यांनी दिल्या.

प्रचारावर नियंत्रण: निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिराती, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स प्रसिद्ध करण्यापूर्वी समितीची अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आचारसंहिता पालन:

निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि आचारसंहितेच्या तक्रारींसाठी प्रशासनाने खालील संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत:

व्हॉट्सॲप क्रमांक: ७०३०६०३९३९

टोल फ्री क्रमांक: १८००२३३१२१७

बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त नंदू परळकर यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर तांत्रिक माहिती दिली.

अधिकारी व प्रतिनिधींची उपस्थिती

या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केलेले श्रीमती वर्षा शिंगण (ए झोन), बाबासाहेब वाघमोडे (बी झोन), ओमप्रकाश यादव (सी झोन), जयंत उगले (डी झोन) आणि आचारसंहिता कक्षाच्या श्रीमती माधुरी परीट यांच्यासह शहरातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!