लंडनचे तख्त हादरवणारी नाना पाटलांची डरकाळी! ‘पत्री सरकार १९४२’चा दणकेबाज टिझर प्रदर्शित!


लंडनचे तख्त हादरवणारी नाना पाटलांची डरकाळी! ‘पत्री सरकार १९४२’चा दणकेबाज टिझर प्रदर्शित!

गोऱ्या साहेबाची उरलीसुरली चरबी उतरवून त्याला थेट लंडनपर्यंत पळता भुई थोडी करणाऱ्या आपल्या ‘क्रांतिसिंह’ नाना पाटलांच्या शौर्याचा इतिहास शेवटी एकदाचा रुपेरी पडद्यावर धडकला आहे! ‘पत्री सरकार १९४२’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर विट्याच्या क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठात मोठ्या थाटामाटात पार पडला. आजच्या काळात महाराष्ट्राच्या अस्सल मातीतल्या आणि रक्ताच्या क्रांतीची ही गोष्ट पडद्यावर येतेय, हे पाहून छाती ५६ इंच फुगल्याशिवाय राहत नाही!

ब्रिटिशांना ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या आणि जुलुमी सावकारांच्या टाचा ढिल्या करणाऱ्या पत्री सरकारची दहशत इंग्रजांच्या थेट लंडनच्या संसदेपर्यंत पोहोचली होती. तोच धगधगता इतिहास आजची पिढी पडद्यावर पाहणार आहे. जी. डी. बापू लाड आणि नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासारख्या मर्दांची ही शौर्यगाथा म्हणजे केवळ चित्रपट नाही, तर आपल्या पराक्रमाचा जिवंत दस्तऐवज आहे!

या चित्रपटाची धुरा मनीष अनसुरकर यांनी पेलली आहे – म्हणजे गीत, संगीत, लेखन आणि दिग्दर्शन अशी सगळी सूत्रे त्यांनी एकट्यानेच सांभाळली आहेत. ‘भागीरथी मोशन पिक्चर’च्या विशाल गोविंदराव जाधव यांनी या भव्य निर्मितीचा भार पेललाय. तर अनिल राबाडे, सिद्धार्थ बढी, शुभम गवई, अभिमन्यू पायल यांसारख्या कलाकारांची फौज यात पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक अनसुरकर म्हणाले की, “नाना पाटलांचा प्रवास दाखवताना खूप दडपण होतं!” अहो अनसुरकर साहेब, दडपण असणारच! कारण क्रांतीसिंहांची डरकाळी पडद्यावर मांडायची म्हणजे छातीत फुप्फुसं नाही, तर धगधगता कोळसा लागतो

महाराष्ट्राच्या या मातीत पेटलेल्या स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाची आणि क्रांतीकारकांच्या वाघासारख्या काळजाची कथा अबालवृद्धांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टिझर तर आलाय, आता उत्सुकता फक्त ट्रेलरची आणि चित्रपटाची आहे!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!