दुःखद वार्ता: जाहिदा बी सय्यद यांचे निधन


दुःखद वार्ता : जाहिदा बी सय्यद यांचे निधन

पुणे : येथील रहिवासी मरहूम बाबा कादरी यांच्या सासू आणि मरहूमा शमीम बानो कादरी यांच्या मातोश्री जाहिदा बी सय्यद यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सय्यद आणि कादरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिदा बी सय्यद या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक आणि परिचित व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

आज सकाळी होणार अंत्यविधी: मरहूमा जाहिदा बी सय्यद यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११:३० वाजता रोशन मस्जिद येथे नमाज़-ए-जनाझा (अंत्यविधीची प्रार्थना) पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच दूल्हा-दुल्हन कब्रिस्तान येथे त्यांना दफन करण्यात येईल.

त्यांच्या पश्चात मोठा परिवार, नातेवाईक आणि आप्तस्वकीय असा परिवार आहे. अल्लाह मरहूमांना जन्नतुल फिरदौसमध्ये उच्च स्थान प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबाला हे मोठे दुःख सहन करण्याचे धैर्य देवो, हीच प्रार्थना.

– शोकाकुल – सय्यद आणि कादरी परिवार व सर्व मित्र परिवार.

– प्रेस मीडिया लाईव्ह परिवार


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!