अॅडव्होकेट अमित मोरे यांना मिरज येथे ‘प्राईड ऑफ नेशन २०२५’ पुरस्काराने सन्मानित


अॅडव्होकेट अमित मोरे यांना मिरज येथे ‘प्राईड ऑफ नेशन २०२५’ पुरस्काराने सन्मानित

मिरज: सामाजिक व वकिली क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुण्याचे प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट अमित मोरे यांना दि. २९/१२/२०२५ रोजी ‘प्राईड ऑफ नेशन २०२५’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रेस मीडिया लाईव्हच्या वतीने आयोजित या दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते महमूद रफीक मांगुरे यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

अॅडव्होकेट अमित मोरे हे पुणे येथे वकिली क्षेत्रात कार्यरत असून, विशेषतः गरीब आणि पीडित लोकांसाठी कायदेशीर लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे मोठे कार्य ते करत आहेत. त्यांच्या या सामाजिक जाणीवेची आणि कायदेशीर क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

अॅडव्होकेट अमित मोरे हे पुण्याचे प्रसिद्ध फौजदारी वकील अॅडव्होकेट साजीद ब. शाह यांच्या असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांच्या या यशाबद्दल मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांनी देखील त्यांचे विशेष कौतुक केले.

या सोहळ्यासाठी व्यासपीठावर लियाकत सर्जेखान, विजय चव्हाण (पुणे), गोरखनाथ चिखलकर, सौ. अनिता पाटील, ज्येष्ठ संपादक डी. एस. शिंदे, सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ, अनिस जमादार, इचलकरंजी ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबासो राजमाने आणि यासर सौदागर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील १०० गुणवंतांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!