अभिनेते महमदरफिक मांगुरे यांच्या हस्ते ॲड. साजिद बी. शाह यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान


अभिनेते महमदरफिक मांगुरे यांच्या हस्ते ॲड. साजिद बी. शाह यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

मिरज/पुणे: सामाजिक बांधिलकी आणि कायदेशीर क्षेत्रातील निस्पृह सेवेबद्दल पुण्यातील सुप्रसिद्ध ॲड. साजिद बी. शाह यांना यावर्षीचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. मिरज येथे २९ डिसेंबर रोजी पार पडलेल्या एका भव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते महमदरफिक मांगुरे यांच्या हस्ते ॲड. शाह यांना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रेस मीडिया लाईव्हच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ॲड. साजिद बी. शाह यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि शाल-श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये डॉ. सलीम आळतेकर, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद देशपांडे, लियाकत सर्जे खान, श्रीकांत कांबळे, अशोक मासाळ, मनोज चव्हाण, गोरखनाथ चिखलकर, अनिस जमादार आणि सौ. अनिता पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता.

नेटके नियोजन

प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

ॲड. साजिद बी. शाह यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पुण्यातील वकील वर्ग आणि सामाजिक स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!