कोंढवा-कौसरबाग मध्ये काँग्रेसची ‘युवा लाट’; मोहसीन शेख यांच्या एन्ट्रीने राजकीय गणिते बदलली!


कोंढवा-कौसरबाग मध्ये काँग्रेसची ‘युवा लाट’; मोहसीन शेख यांच्या एन्ट्रीने राजकीय गणिते बदलली!

 

पुणे  : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ चे बिगुल वाजण्यापूर्वीच कोंढवा खुर्द – कौसरबाग (प्रभाग क्रमांक १९) मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार तसलीम हसन शेख यांच्या प्रचारात त्यांचे सुपुत्र आणि लोकप्रिय युवा नेते मोहसीन शेख यांनी उडी घेतल्याने या प्रभागातील लढत आता अधिक चुरशीची झाली असून काँग्रेसचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.

सोशल मीडिया आणि ‘हायटेक’ प्रचार

पारंपरिक प्रचाराला फाटा देत मोहसीन शेख यांनी ‘डिजिटल’ प्रचारावर भर दिला आहे. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि जनसंपर्काचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. विशेषतः तरुणांमध्ये असलेली त्यांची क्रेझ आणि दांडगा जनसंपर्क यामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

संवेदनशील नेतृत्व: ‘जनसामान्यांचा आवाज’

केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता, मोहसीन शेख यांनी मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. “राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे” या त्यांच्या भूमिकेमुळे कोंढव्यातील नागरिकांमध्ये त्यांची एक संवेदनशील नेता म्हणून प्रतिमा तयार झाली आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा समजून घेण्याच्या त्यांच्या शैलीचे कौतुक होत आहे.

विकासाचा नवा ‘रोडमॅप’

यावेळी बोलताना मोहसीन शेख यांनी सांगितले की:

“हा लढा केवळ खुर्चीसाठी नाही, तर प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी आहे. नागरिकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. आम्हाला आश्वासनांचा पाऊस पाडायचा नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून विकासाचे राजकारण करायचे आहे.”

काँग्रेसची स्थिती भक्कम

तसलीम हसन शेख यांचा प्रदीर्घ अनुभव आणि मोहसीन शेख यांची युवा ऊर्जा या ‘मदर-सन’ जोडीमुळे काँग्रेसने प्रभागात मोठी आघाडी घेतल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता प्रभाग क्रमांक १९ मधील जनता या युवा नेतृत्वाला किती मताधिक्य देते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!