निवडणूक आयोगाकडे संशोधनासाठी दोन लाख रुपये नाहीत…


निवडणूक आयोगाकडे संशोधनासाठी दोन लाख रुपये नाहीत…

प्रेस मीडिया लाईव्ह

डॉ. तुषार निकाळजे या पुण्यातील संशोधकाने निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे निवडणूक प्रशासकीय संशोधनासाठी दोन लाख रुपयांची ऑक्टोबर 2024 मध्ये मागणी केली होती. या प्रस्तावामध्ये भविष्यातील होणाऱ्या जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगरपालिका, लोकसभा इत्यादी निवडणुकांच्या वेळी काही प्रशासकीय सुधारणा केल्यास निवडणूक आयोगाचे सबलीकरण होईल, 97 कोटी मतदार, 10 लाख 48 हजार मतदान केंद्रावर काम करणारे 56 लाख मतदान कर्मचारी, पोलीस व सुरक्षा यंत्रणा यांचा ताण कमी होईल असे या प्रस्तावात म्हटले होते.

निवडणूक आयोगाने डॉ. निकाळजे यांचा प्रस्ताव उपयुक्त असल्याचे कळविले होते. परंतु हा प्रस्ताव मंजूर किंवा ना मंजूर किंवा प्रायोगिक तत्वावर मुलाखतीसाठी देखील कळविले नाही. डॉ. निकाळजे यांनी एका निवडणुकीच्या वेळी संपूर्ण भारतामध्ये 524 कोटी रुपयांची बचत होत असते ही

बाब यापूर्वीच निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणली होती. नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रक्रियेतील अपयशाबद्दल निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. हा प्रकल्प मंजूर केला असता किंवा प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली असती तर किमान 70 टक्के फरक पडला असता, तसेच मतदारांच्या सहभागामुळे मतदानाची टक्केवारी 14 टक्क्यांनी वाढली असती.डॉ. निकाळजे एका विद्यापीठातील सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी आहेत. शासनातील एखाद्या कारकूनाने भारताच्या निवडणूक प्रशासन विषयावर संशोधन करणे ही बाब कदाचित निवडणूक अधिकाऱ्यांना पचनी पडली नसेल किंवा हा एक प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित झाला की काय? परंतु या सर्व बाबींमध्ये निवडणूक आयोगाने स्वतःच्या चुकीमुळे विनाकारण स्वतःवर टीका ओढवून घेतली आहे.


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!