पोलीस मित्रांच्या खांद्यावर जबाबदारीचा भार ; अहिल्यानगरच्या शिबिरातून समाजसेवेचा नवा ‘जयजयकार’!

अहिल्यानगर:
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने’च्या मार्गदर्शन शिबिराचे. साध्यासुध्या शिबिराचे रूपांतर जणू एका मोठ्या सामाजिक सोहळ्यात झाले होते. ज्यांच्या खांद्यावर समाजाची सुरक्षा आणि पत्रकारितेची धुरा आहे, ते सर्वजण आज एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते!
संस्थेचे सर्वेसर्वा दीपक कांबळे आणि मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चांगलाच रंगला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्री ताई उत्पात आणि संचालक तथा रायगड जिल्हाध्यक्षा सौ. दमयंतीताई कोळी यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि अहिल्यानगरचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी उपस्थितांना कानमंत्र देताना सांगितले की, “आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात पोलीस मित्रांची भूमिका ही डोळ्यांत तेल घालून काम करण्यासारखी आहे. तुम्हाला कोणत्याही संकटात पोलीस प्रशासनाची खंबीर साथ मिळेल.”
तसेच, नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी संघटनेच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना सांगितले की, “जे काम व्यवस्थेला कठीण वाटते, ते काम ही संघटना अहोरात्र निस्वार्थपणे करत आहे, हे पाहून आम्हा सर्वांना अभिमान वाटतो.”
दीपक कांबळे, कमलेश शेवाळे आणि कोकण विभागाचे शिल्पकार रवींद्र करंगुटकर यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांचा आढावा घेताना उपस्थितांना कर्तव्याची जाणीव करून दिली. पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह माल्तेश सर, प्रमोद हिगे, पत्रकार मिलिंद टेमकर आणि मंतोष मिश्रा या मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.
या शिबिरात खोपोली शहर उपाध्यक्ष वर्षा साळुंके, अशोक पालांडे, लक्ष्मण होळकर, गिता गौतम, ललित म्हात्रे, सतिश राणीम, हरजिंदर कौर, रितेश मोरे, मलखितसिंग विहाल, हनुमंत मानकर, वर्षा कदम, विजय शिंदे, विजय परदेशी, कल्पना कांबळे, मिना फिरके, रेणुका राठोड, अमित मोरे तसेच रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षा दिक्षा माने, ग्रामीण जिल्हाध्यक्षा प्रणिता घोलप, दक्षता मोरे, उल्का नार्वेकर, विनिता आरेकर, पुर्वा चव्हाण, मनिषा वगरे, रवीना जंगम, मधुरा भोपळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम पाहता, आता ‘स्वराज्य पोलीस मित्रां’च्या या कार्याचा आवाज दूरवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की!
#स्वराज्यपोलीसमित्र #अहिल्यानगर #समाजसेवा #पोलीसमित्र #महाराष्ट्रपोलीस #पत्रकारसंरक्षण #सामाजिकजागृती #मार्गदर्शनशिबीर #PressMediaLive

























