महा अधिवेशन’ नव्हे, निवृत्तीधारकां साठी ‘महा उपलब्धी ’ची सोय


सांगलीत पेन्शन मेळाव्यात ‘महा उपलब्धी’ ॲपची माहिती;निवृत्तिवेतनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

*सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ*

सांगली, दि. ६ : जिल्हा कोषागार कार्यालय, सांगली यांच्या वतीने जिल्हा परिषद सांगली येथील कै. पद्मविभूषण वसंतदादा पाटील सभागृहात पेन्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. निवृत्तिवेतनधारकांच्या प्रश्नांना मार्गदर्शन आणि आधुनिक सुविधांची माहिती देणाऱ्या या मेळाव्यास जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

ही कार्यशाळा प्रधान सचिव, लेखा व कोषागारे, वित्त विभाग श्रीमती रीचा बागला तसेच संचालक, लेखा व कोषागारे श्रीमती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.

यावेळी ‘महा उपलब्धी’ ॲप संदर्भात निवृत्तिवेतनधारकांना सविस्तर माहिती देण्यात आली. निवृत्तिवेतनाचा तपशील, हयातीचा दाखला, आयकर विवरणपत्र, शासन निर्णय तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचना आदी महत्त्वाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे पूर्वी कागदांच्या गठ्ठ्यात शोधावी लागणारी माहिती आता मोबाईलच्या पडद्यावर सहज मिळणार आहे!

मेळाव्यास जिल्हा परिषद सांगलीच्या उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती ठवळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद काळे, पेन्शन असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. पाटील, कोषागार अधिकारी श्रीमती रेणुका पाटील, अप्पर कोषागार अधिकारी श्री. रोहन शेटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. श्री. सुहास कामेरीकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रतीक्षा चव्हाण यांनी केले.

निवृत्तीच्या आयुष्यात कागदपत्रांची धावपळ कमी करून माहिती आणि सेवा एका क्लिकवर देण्याचा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह ठरला, अशी भावना उपस्थित निवृत्तिवेतनधारकांनी व्यक्त केली.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती सुनंदा ठवळे, प्रमोद काळे, श्रीमती रेणुका पाटील, रोहन शेटे, सुहास कामेरीकर, श्री. दिलीप पाटील हे प्रामुख्याने अधिकारी उपस्थित होते. तसेच कर्मचारी श्रीमती. योगिता रोकडे, श्रीमती प्रतीक्षा चव्हाण, श्री. संतोष चंदनशिवे, श्री. अभिजीत कोळी श्री. शुभम कदम, श्री. संदीप भोसले इत्यादी उपस्थित होते.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!