उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील एका पत्राने रँकिंग घसरलेल्या विद्यापीठांची सुरू झाली धावपळ…
प्रेस मीडिया लाईव्ह
पुण्यातील एका नागरिकाने महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठांचे जागतिक पातळीवर तब्बल ४०० क्रमांकांनी झालेल्या घसरणीबाबत माननीय मुख्यमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना खंत व चिंता व्यक्त केली. या संदर्भात “रँकिंग घसरलेल्या संबंधित विद्यापीठांचे कुलगुरू, प्र- कुलगुरू व कुलसचिव यांना बदलण्यात यावे”, असे निवेदन या नागरिकाने दिले आहे. याची गंभीर दखल घेऊन माननीय अप्पर मुख्य सचिव, उच्च व तत्र शिक्षण, मुंबई कार्यालयाने उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, मुंबई व संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना या प्रकरणासंदर्भात पत्रव्यवहार करून माहिती मागविली आहे. त्यामुळे आता रँकिंग घसरलेल्या विद्यापीठांची धावपळ सुरू झाली आहे. काही विद्यापीठांनी त्यांच्या संबंधित महाविद्यालयांकडून संशोधनासाठी नवीन प्रस्ताव मागविले आहेत, तसेच त्यांना संशोधनाचा निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माहिती मागविली आहे.































