दोन आरोपी विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल , अॅड. साजिद ब शाह यांच्या लढयाला यश.


दोन आरोपी विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल , अॅड. साजिद ब शाह यांच्या लढयाला यश.

पुणे : दि. २०/१०/२०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिडीत महिलेचा भाचा अहृद शेख वय १० वर्ष यांस पिडीतेच्या घरा शेजारी राहणारे आरोपी तन्वीर चौधरी व फैय्याज चौधरी यांनी जाणीवपूर्वक त्याच्या तोंडावर फटाका फोडून त्याला जखमी केले त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिडीत महिलेचा भाऊ अनस शेख हा घडलेल्या प्रकारामुळे आरोपी तन्वीर चौधरी व फैय्याज चौधरी यांना जाब विचारण्यासाठी गेले असताना आरोपी तन्वीर चौधरी व फैय्याज चौधरी यांनी अनस शेख याला हाताने मारहाण करत असताना पिडीत महिला भांडणे सोडविण्यासाठी गेले असता आरोपी तन्वीर चौधरी याने पिडीत महिलेचा भयंकर प्रकारे विनयभंग केला तसेच जबरदस्तीने रेप करण्याची धमकी देवून व घाणेरडया शिव्या देवून पळून गेले घडल्या प्रकारामुळे पिडीत महिला अत्यंत घाबरुन गेली. सदर प्रकरणाबाबत पिडीत महिला कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेली असता संबंधीत पोलीसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली त्यानंतर पिडीत महिला अॅँड, साजीद ब. शाह, अॅड. हबीब खान, अॅड. मुस्कान कोतवाल यांच्यामार्फत संबंधीत पोलीस स्टेशन मध्ये व मा. पोलीस आयुक्तसो यांना लेखी तक्रार केली. दि. १८/११/२०२५ रोजी कोंढवा पोलीसांनी दोन्ही आरोपींविरोधात बी .एन .एस. २०२३ कलम ७४, ७५, ३५१ (२), ३५१ (३), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

सदर प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक क. घाडगे साहेब यांचेपिडीत महिलेने आभार व्यक्त केले, सदर प्रकरणात पिडीत महिलेतर्फे अॅँड. साजीद ब. शाह हे काम पहात आहेत ,


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!