देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा मनमानी कारभार ; जन्म-मृत्यू दाखल्यावर शिक्के नसल्याने नागरिक हवालदिल


शिवसेना शहराध्यक्ष दीपक चौगुले यांनी खासदारांना दिले निवेदन; खासदार बारणे यांचे सीईओना कडक निर्देश

देहूरोड (प्रतिनिधी, चंद्रशेखर पात्रे):

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील ढिसाळ कारभार आणि प्रशासनाकडून घातल्या जाणाऱ्या जाचक अटींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येबाबत शिवसेना (शिंदे गट) देहूरोड शहराध्यक्ष दीपक चौगुले यांनी शिष्टमंडळासह मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून दिले जाणारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन स्वाक्षरीचे असते, मात्र त्यावर अधिकृत शिक्का नसतो. यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड काढताना हे दाखले नाकारले जात असून अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दीपक चौगुले यांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिले की, नागरिक दाखला घेण्यासाठी गेले असता त्यांना प्रथम ‘मालमत्ता कर’ भरल्याची पावती मागितली जाते. कर भरला नसेल तर दाखला देण्यास टाळाटाळ केली जाते. वास्तविक पाहता, जन्म-मृत्यू दाखल्यासाठी केवळ विहित शुल्क भरणे आवश्यक असते, कराची अट घालणे पूर्णपणे नियबाह्य आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी तात्काळ भ्रमणध्वनीवरून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रावर विनाविलंब सही-शिक्के मारून द्यावेत आणि दाखले देताना कोणतीही बेकायदेशीर अट लादू नका, अशा स्पष्ट सूचना खासदारांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी शिष्टमंडळात शिवसेना मावळ तालुका प्रमुख पै. रामभाऊ सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचरणे, युवासेना शहराध्यक्ष सुरेश बागाव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!