व्यायामशाळा भ्रष्टाचाराची भूक सत्ताधाऱ्यांना सोडवेना
पुणे- पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग २७ मधील लोकमान्य नगर मधील लोकमान्य नगर व्यायामशाळेत पुनः वीज चोरी झाल्याचे समोर आले असून शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत आणी युवक काँग्रेस चे सागर धाडवे यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता व्यायामशाळेत सायंकाळच्या वेळी मुद्दाम अंधार ठेऊन पंखे चालू असल्याचे निदर्शनास आले, या वरून सदर ठिकाणी पुनः वीजचोरी सुरू असल्याचे दिसून आले .

या लोकमान्य नगर व्यायामशाळेत जून २०२५ ला वीजचोरी झाल्याचे स्पष्ट झाले होते त्यावेळी १ लाख ८१ हजार रुपयांचा दंड महावितरण ने वीजचोरी साठी पुणे मनपा ला लावण्यात आला.
पुणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मधे भाजपा चे ३ नगरसेवक असून प्रभागातील भाजपच्या एका मोठ्या नेत्यावर मागील काही महिन्यांपूर्वी प्रभागातील तीन व्यायामशाळा अनाधिकृत पणे ताब्यात ठेवणे, त्यातून उत्पन्न घेणे, असा आरोप झाल होता तर ह्याच तीन व्यायामशाळेत वीज चोरी झाल्याचे उघड झाले होते त्यात लाखो रुपयांचा दंड पुणे मनपा ला लागला आणी काही भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे हजारो कोटींची पुणे मनपा वीजचोर ठरली ही घटना पुणेकर करदात्यांच्या मनाला ठेच पोहचविणारी होती, सदर पुणे मनपा ची लोकमान्य नगर व्यायामशाळा आजही अनधिकृतपणे सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याने महाविकास आघाडी च्या वतीने सदर विषयात पोलिस तक्रार करून चौकशी करणार असल्याचे कळविण्यात आले .
यावर बोलताना काँग्रेस चे सागर धाडवे म्हणाले की सत्ताधाऱ्यांना चोरीची सवय झाली आहे तसेच मनपाच्या जागा ताब्यात ठेवण्यात गौरव वाटत आहे लोकमान्य नगर व्यायामशाळा लाईट तोडली असताना पुनः अंधारात पंखे लाऊन, विजेवरील व्यायामाची उपकरणे चालवून अनेक तरुण व्यायाम करताना दिसतात त्यांच्याशी बोलणे झाल्यावर प्रतीकी २५०/-₹ फी आजही घेतली जात असल्याचे निदर्शनास आले, पुणे मनपा मालमत्ता विभाग सदर मालमत्ता ताब्यात का घेत नाही हा प्रश्न आहे तसेच महावितरण चे कर्मचारी अधिकारी डोळेझाकून काम करत आहेत का की त्यांचाच आशीर्वाद आहे ?.
तसेच शिवसेनेचे अनंत घरत म्हणाले वीजचोरी करणारे आणी तरुणांकडून व्यायामासाठी पैसे घेणारी टोळी आजही सक्रिय असून पुणे विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या, मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणी सत्ताधारी नगरसेवकाच्या संगनमताने, आशीर्वादाने हा खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे, सामान्य माणसावर अन्याय आणी भ्रष्टाचाऱ्यांना न्याय ही महावितरण ची सोयिस्कर भूमिका दिसत आहे .
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर































