देहुरोड, राष्ट्रीय एकात्मता दौड रन फॉर युनिटीला विद्यार्थी सह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


रन फॉर युनिटी मध्ये विद्यार्थी सह ३०० ते ३५० लोकांचा सहभाग ‌ 

देहुरोड दि.:- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या निमित्ताने देहुरोड पोलीस ठाण्याच्या वतीने दिनांक ३१/१०/२०२५ रोजी रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित करण्यात आली. एकता दौड रन फॉर युनिटी मध्ये काव्य कॅरिअर अकॅडमी चे विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिक शांतता कमिटी सदस्य प्रतिष्ठीत नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान व भारताचे अखंड भारताच्या एकात्मतेची शपथ घेण्यात आली त्यानंतर सकाळी सात वाजता ही एकता दौड रॅली किवळे विकास नगर उपायुक्त कार्यालय परिमंडळ २ येथुन शुभारंभ करण्यात आला

 

ही रॅली टी सी काॅलीनी, विकास मेडिकल, एम बी कॅम्प, देहुरोड अंकित पोलीस चौकी मुंबई पुणे रोड (सवाना उपहारगृह) स्वामी विवेकानंद चौक मार्गे देहुरोड पोलीस ठाणे येथे येऊन संपन्न झाली. या एकात्मता दौड रॅलीचे प्रमुख आकर्षण काव्य कॅरिअर अकॅडमी चे विद्यार्थ्यांनी नीळे पोशाख घालून सहभागी झाले होते.

या एकात्मता दौड रॅलीत विद्यार्थीसह ३००/३५० लोकांनी सहभाग नोंदविला यावेळी देहुरोड विभागाचे सहायक पोलिस उपायुक्त बाळासाहेब कोपनर देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे सह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रन फॉर युनिटी कार्यक्रम मध्ये विद्यार्थी सह जेष्ठ नागरिक पोलीस दलाने राष्ट्रीय एकात्मतेचा राष्ट्र प्रेमभावना सामाजिक बांधिलकीचा स़देश दिला या रन फॉर युनिटी एकता दौड च्या वेळी वैद्यकीय पथक तसेच रुग्णवाहिका आणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आली होती. राष्ट्रीय एकात्मता दौड च्या निमित्ताने देशाची अखंडता व एकनिष्ठता सामाजिक बांधिलकी अनुभवायला मिळाला.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!