देशभरातून शुभेच्छांचा महापूर ! विक्रमांचे ‘शहेनशहा’ ठरले ‘प्रेस मीडिया लाईव्ह’!


देशभरातून शुभेच्छांचा महापूर ! विक्रमांचे ‘शहेनशहा’ ठरले ‘प्रेस मीडिया लाईव्ह’!

संस्थेच्या शिरपेचात मानाचा जागतिक तुरा; ‘रायझिंग स्टार’ विक्रमाची देशभर चर्चा!

 

पुणे | अहो, याला म्हणतात खरी ‘गरुडभरारी’! ज्यांच्या लेखणीतून शब्दांचे अंगारे फुलतात आणि ज्यांच्या विचारात समाजाची कळकळ ओतप्रोत भरलेली आहे, त्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ समूहाने यशाचे एक नवे शिखर सर केले आहे. ‘क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या दैदीप्यमान यशानंतर, आता या समूहाच्या शिरपेचात ‘Rising Star International Book of World Records’ या जागतिक मानाच्या पुरस्काराची विक्रमी नोंद झाली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण देशातून अभिनंदनाचा कडकडाट आणि शुभेच्छांचा महापूर लोटला आहे!

काश्मीर ते कन्याकुमारी… फक्त ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चा दरारा!

या ऐतिहासिक विजयाने मराठी पत्रकारितेची मान उंचावली असून, देशभरातील वाचक-प्रेक्षकांकडून ‘प्रेस मीडिया लाईव्ह’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडिया असो वा टेलिफोन, प्रत्येक ठिकाणाहून “निर्भीड पत्रकारितेचा हाच खरा गौरव!” अशा शब्दांत जनमानसातून प्रतिसादाचा महापूर लोटला आहे. हा केवळ एका वृत्तपत्राचा विजय नसून, सत्याचा आणि वाचकांच्या अफाट प्रेमाचा हा महाविजय आहे!

॥ कृतज्ञता ॥
“हे यश माझे एकट्याचे नसून, ‘प्रेस मीडिया लाईव्ह’वर अतोनात प्रेम करणाऱ्या माझ्या लाखो वाचक आणि प्रेक्षकांचे आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच ही ‘गरुडभरारी’ शक्य झाली. देशभरातून येणारा शुभेच्छांचा हा महापूर माझ्यासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. हा जागतिक सन्मान मी माझ्या वाचकांना समर्पित करतो. सर्वांचे मनापासून आभार!”

— विश्व विक्रमवीर संपादक, मा. मेहबूब सर्जेखान

लेखणीचा वार अन् समाजाचा सत्कार!

‘प्रेस मीडिया लाईव्ह’ म्हणजे पत्रकारितेच्या मैदानातले एक कसलेले ‘शहेनशहा’. गेली अनेक वर्षे या संस्थेची लेखणी अन्यायावर आसूड ओढत आली आहे. त्यांचा तो धारदार बाणा आणि समाजाबद्दलची ती अफाट तळमळ आज जगाने मान्य केली आहे. ‘बोललेलं कळतं, पण लिहिलेलं वळतं’ असं म्हणतात, ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या बाबतीत तर त्यांचं लिहिलेलं थेट काळजाला भिडतं!

आधार मधुमेह मुक्त चे प्रमुख अनिस जमादार यांनी प्रेस मीडिया लाईव्ह च्या कामाचे कौतुक करून  शुभेच्या दिल्या
साई समर्थ हेल्थ सर्व्हिसेसकडून जल्लोष
या विक्रमी नोंदीबद्दल ‘साई समर्थ हेल्थ सर्व्हिसेस’च्या सर्व सभासदांकडून ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे मनापासून अभिनंदन करण्यात आले आहे. “ज्यांच्या कार्याचा पाया प्रामाणिकपणा असतो, त्यांच्या नशिबात असे जागतिक विक्रमच लिहिलेले असतात,” अशा शब्दांत संस्थेच्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!