कोंढवा  खडी मशीन चौकात आज झालेल्या गोळीबारात  गणेश काळे  या  युवकाचा  मृत्यू. .


कोंढवा  खडी मशीन चौकात आज झालेल्या गोळीबारात  गणेश काळे  या  युवकाचा  मृत्यू. .

पुणे : येथील कोंढवा  खडी मशीन चौकात आज झालेल्या गोळीबारात  गणेश काळे  वय अंदाजे ३५-३६, रा. येवलेवाडी).हा तरुण युवक  ठार झाला. त्याच्यावर गुन्हेगाराने सलग गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून हल्ला केला.

या बाबतची अधिक माहिती अशी की , गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्याप्रकरणात आरोपी होता आणि त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही हत्या टोळीयुद्धाचा भाग असल्याची शक्यता तपासली जात आहे. घटनास्थळी तात्काळ पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी वनराज आंदेकरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली, त्या हत्येच्या मास्टरमाइंड सोमनाथ गायकवाड व त्याचा साथीदार समीर काळे यावर आंदेकर टोळीचे बारकाईने लक्ष होते. आज समीर काळे यांचा भाऊ गणेश काळे हा खडीमशीन येथून येवलेवाडीकडे जात असताना भारत पेट्रोल पंपासमोर त्याला दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार इसमांनी गोळ्या घालून त्याची रिक्षातच हत्या केली. या घटनेमुळे कोंढवा परिसरात आणि संपूर्ण पुण्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!