हॉटेल उत्सव बार अँड रेस्टॉरंट यांनी महात्मा गांधी जयंती दिवशीच केली दारू विक्री , कारवाई करण्याची मागणी
प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील
दिनांक 02/10/2025 रोजी महात्मा गांधी यांची जयंती दिवस असताना मद्य विक्री प्रतिबंधीत आदेश लागु असताना हॉटेल उत्सव बार अँण्ड रेस्टॉरंट, सिद्धेश्वरी कॉर्नर, पाताळगंगा रसायनी या आस्थापने मध्ये खुल्या पद्धतीने दारू विक्री सुरू होती त्यामुळे त्या आस्थापने विरूद्ध कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले आहे. श्री स्वप्निल भोवड, यांनी तक्रार दाखल करून हॉटेल उत्सव अँड रेस्टॉरंट यांचा भांडाफोड केला आहे. या बाबत मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क रायगड यांना पत्रव्यवहार करण्यात आला असुन पुढील कारवाही कोणत्या दिशेने करणार आहेत याची पातळगंगा रसायनि परिसरातील जनतेचे लक्ष लक्ष लागून राहिले आहे
आपण दिनांक 02/10/2025 रोजी केलेला अर्ज दिनांक 07/10/2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने रसायनी पोलीस ठाणे येथे प्राप्त झाला आहे. हॉटेल उत्सव बार अॅण्ड रेस्टॉरंट या आस्थापनेमधील दिनांक 02/10/2025 रोजीचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता हॉटेल उत्सव बार अँण्ड रेस्टॉरंट हि आस्थापना सुरू असुन हॉटेलच्या खिडकीवाटे मद्य विक्री सुरू असल्याचे त्यामध्ये दिसुन येत आहे. सदरचे सीसीटीव्ही फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये ताब्यात घेण्यात आले आहेत.
हॉटेल उत्सव बार अँण्ड रेस्टॉरंट, पाताळगंगा, रसायनी या आस्थापनेस शासनाकडुन मद्य विक्री परवाना देण्यात आला असून त्याचा परवाना क्रमांक 83/1989 असा आहे. दिनांक 02/10/2025 रोजी महात्मा गांधी जयंती दिवस निमीत्त मद्य विक्री प्रतिबंधीत दिवस घोषीत असताना हॉटेल उत्सव बार अँण्ड रेस्टॉरंट, पाताळगंगा रसायनी, ता. खालापूर यांनी आस्थापना सुरू ठेवुन मद्य विक्री केल्याचे दिसून येत असल्याने त्यांनी परवाना कराराचा भंग केलेला आहे. त्यामळे हॉटेल उत्सव बार अँण्ड रेस्टॉरंट, सिद्धेश्वरी, पाताळगंगा रसायनी ता. खालापूर या आस्थापनेचा परवाना रद्द करण्याकरीता मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क रायगड यांना पत्रव्यवहार करण्यात आला असुन सोबत सीसीटीव्ही फुटेजचा पेन ड्राईव्ह पाठविण्यात आला आहे. सबब आपला तक्रारी अर्ज दप्तरी फाईल करण्यात आला आहे.
-(नितीन शेडगे) पोह/745, रसायनी




























