बारा बलुतेदारना मी कायम सहकार्य करेन – माजी सरपंच श्री गणेश मंगसुळे .
प्रेस मीडिया लाईव्ह :
राष्ट्रीय समाज पक्षाचे कोल्हापूर (दक्षिण विभाग) अध्यक्षपदी श्री विठ्ठल मंगसुळे यांची निवड करून त्यांना या समाजाचे प्रदेश अध्यक्ष श्री काशीनाथ शेवते यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव श्री ज्ञानेश्वर सलगर व सरचिटणीस श्री अजित पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री आनंदराव शिंदे व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते श्री गणेश मंगसुळे यांचा सत्कार करण्यात आला. .
या सत्कार मंगल प्रसंगी कार्यक्रम च्या ठिकाणी कोल्हापूर शिवसेना (उबाठा)चे प्रमुख श्री संजय दादा चौगुले उद्योजक विनोद अबदान राज बाणदार (कॉन्ट्रॅक्टर) सुरज गोरंबे इसाक मुजावर अभिषेक पाटील इत्यादी उपस्थित होते































