विद्येच्या माहेर घरात बनावट औषधांचा बाजार ; ‘अक्षय फार्मा’चे पाप उघड, ८ जणांना पोलीस कोठडीची हवा!


विद्येच्या माहेर घरात बनावट औषधांचा बाजार ; ‘अक्षय फार्मा’चे पाप उघड, ८ जणांना पोलीस कोठडीची हवा!

पुणे हे विद्येचे माहेरघर, संस्कृतीचे लेणे आणि सदाचाराचा वारसा सांगणारे शहर… पण आज याच पुण्याच्या छाताडावर बसून काही नराधमांनी मानवतेला काळिमा फासला आहे! ज्या हातांनी औषध देऊन रुग्णाचे प्राण वाचवायचे, त्याच हातांनी बनावट औषधांची पुडकी विकून मृत्यूचा व्यापार मांडला आहे. सदाशिव पेठेतील ‘अक्षय फार्मा’च्या आडोशाने सुरू असलेला हा बनावट औषधांचा काळा बाजार पाहून खुद्द यमदेवही थक्क झाले असतील!

पांढरपेशी वेशातील ‘कसाब’!
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) टाकलेल्या धाडीत २ लाख ७५ हजारांचा बनावट औषध साठा जप्त झाला आहे. टेरेंट फार्मास्युटिकल्सच्या नावाने ‘ट्रिप्सिन’ नावाच्या गोळ्या विकून हे महाभाग आपली घरे भरत होते. अक्षय पुनिया, अमृत जैन आणि त्यांच्या टोळीतील त्या ८ जणांनी पुण्याच्या पवित्र भूमीला बदनाम केले आहे. हे केवळ औषध विक्रेते नसून, पांढऱ्या कपड्यांतील ‘कसाब’ आहेत, अशा शब्दांत पुणेकर आपला संताप व्यक्त करत आहेत.

बिहार ते सिक्कीम: पाप्यांचे जाळे !

या प्रकरणाचे धागेदोरे थेट बिहारच्या गोपालगंजपर्यंत आणि सिक्कीमच्या पहाडांपर्यंत पोहोचले आहेत. बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने पुण्यात औषधे खपवायची, हा यांचा धंदा! अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त गिरीष हुकरे यांनी हा ‘बनावटगिरीचा’ बुरखा फाडला असून विश्रामबाग पोलिसांनी या टोळीला आता कोठडीची हवा दाखवली आहे.

पुणेकरांनो आता  डोळे उघडा !

सदाशिव पेठेतून आता ज्ञानाचा नव्हे, तर फसवणुकीचा धूर निघू लागला आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना अशी अद्दल घडली पाहिजे, की पुन्हा कोणाचीही रुग्णांच्या जीवाशी खेळण्याची हिंमत होता कामा नये.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!