महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान सन्मान संघच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण. 


महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान सन्मान संघच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण. 

–

देहूरोड दि ‌ :- संविधान सन्मान संघच्या वतीने महामानव बोधीसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपुर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संविधान सन्मान संघचे अध्यक्ष डॉ रामदास ताटे व संविधान सन्मान संघचे कोषाध्यक्ष बाबु हिरमेठकर यांनी दिप प्रज्वलन केले तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संविधान सन्मान संघ चे जेष्ठ मार्गदर्शक संजय आगळे यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयघोष करीत “जब तक सुरज चांद रहेगा, डॉ बाबासाहेब आंबेडकर तेरा नाम रहेगा, “अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे” असे जयघोष करण्यात आले. डॉ रामदास ताटे यांनी आदरांजली अर्पण करताना म्हणाले आजचा दिवस हे अत्यंत दुःखाच दिवस आहे आजच्या दिवस म्हणजे ६ डिसेंबर १९५६ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत सर्वांना न्याय बंधुता समता व अखंडता देशाला दिले व महिलांना देखील समान न्याय व हक्क दिला देशाचा संपूर्ण कारभार राज्य घटनेवर चालत आहे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना संविधान सन्मान संघच्या वतीने भावपुर्ण आदरांजली समर्पित करतो असे भावना व्यक्त केल्या. यावेळी कार्यकारिणी कमिटीचे अध्यक्ष मोझेस दास यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून भारताला एक मजबुत संविधान बहाल केले आज देश हा संविधानावर चालत आहे बाबासाहेबांनी सर्व सामान्य पासुन ते वंचित असलेल्या लोकांना देखील संविधाना मार्फत न्याय मिळवून दिला असे मनोगत दास यांनी यावेळी व्यक्त केले. ‌संविधान सन्मान संघच्या वतीने संविधान सन्मान फलक डॉ बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्धार समोरील स्वामी विवेकानंद चौक येथे रिक्षा प्रवासी वाहतूक संघटना व संविधान सन्मान संघच्या वतीने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भले मोठे फ्लेक्स संविधान सन्मान संघच्या वतीने लावण्यात आले व तेथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस रिक्षा प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शंकर दोडमणी यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अमर रहे असे घोषणा दिल्या यावेळी संविधान सन्मान संघ चे मार्गदर्शक बौद्धाचार्य संजय आगळे यांनी महामानव बोधीसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे सर्वोच्च संविधान लिहून प्रत्येक भारतीयांना एका सुत्रात बांधून एक समान न्याय दिला आहे सर्व जाति धर्माच्या लोकांना एकसमान न्याय या बाबासाहेबांनी दिला आहे असे यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोझेस दास, संजय आगळे, बाबु हिरमेठकर, विजय पवार, कृष्णा गायकवाड, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शंकर दोडमणी, राहुल गायकवाड, महेश गायकवाड, संजय शेंडे, व्यंकटेश कोळी इत्यादी लोक उपस्थित होते सुत्र संचालन विजय पवार यांनी केले तर आभार प्रकट महेश गायकवाड यांनी मानले.


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!