पिंपरी चिंचवड मध्ये राजकीय भूकंप अजित पवारांचा भाजपसह शिवसेनेला धक्का


पिंपरी चिंचवड मध्ये राजकीय भूकंप अजित पवारांचा भाजपसह शिवसेनेला धक्का.

– अजितदादा पवार ॲक्शन मोडवर अनेक नवीन चेहरेना राष्ट्रवादीत संधी —–

प्रतिनिधी :

पुणे दि.;- पिंपरी चिंचवडमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करताच आपला बालेकिल्ला राखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर आले आहेत पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा भाजपसह शिवसेनेला धक्का दिला आहे.

 

पिंपरी मधील भाजपचे नगरसेवक अश्विनी जाधव, शिवसेनेच्या शहरप्रमुख रूपाली आल्हाट, शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी मंगळवारी सकाळी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. तर भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे.

अजित पवार यांनी ट्विट करत आज माजी नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती दिली. सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नवीन सहकाऱ्यांचा अनुभव कामी येईल आणि त्यातून जनसेवा घडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत घेणार नाही असं स्पष्ट केले. याबाबत बोलताना अजित पवार यांनी आपल्याला मुख्यमंत्री काय बोलले याची कल्पना नाही. मात्र ते बोलले असतील तर विचारपूर्वकच बोलले असतील असे म्हटले आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!