महानगरपालिके तर्फे जाहीर आवाहन “अभय योजना २०२५-२६”
पुणे महानगरपालिके तर्फे शहरातील सर्व सन्माननीय मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र
महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण ८ कराधान नियम मधील नियम कंमाक ५१ नुसार करदात्यांना थकीत दंड ( Penalty) विशेष सूट देण्यासाठी अभय योजना २०२५-२६ ही खालील कालावधीसाठी म्हणजेच दिनांक १५ नोव्हेंबर ২०२५ ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत राबविष्यात येणार आहे. यापूर्वी (सन २०१५-१६,२०१६-१७, २०२०-२१ व
२०२१-२२) या अभय योजनेत ज्या मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे त्या मिळकतधारकांना या अभय योजनेत लाभ दिला जाणार नाही.
पुणे शहरातील सर्व थकीत करदात्यांना असे आवाहन करण्यात येते की, त्यांनी “आभय योजना २०२५-२६ चा
लाभ घ्यावा. थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या दंडाच्या रकमेवर ७५% सूट मिळवावी. वर नमूद केलेल्या कालावधीत संपूर्ण कर (थकबाकीसह) एकरकमी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र, बँक ऑफ महाराष्ट्र,आय .सी. आय .सी. आय. बँक, जनता सहकारी बँक व कॉसमॉस बँक तसेच ऑनलाईनद्वारे भरणेकरिता Propertytax,punesorporation.og या संकेतस्थळ्ावर भरता येईल. पुणे महानगरपालिकेचे सर्व नागरी सुविधा केंद्र शनिवारी व रविवारी तसेच सार्वजनिक सट्टीच्या दिवशी देखील सुरु राहतील.





























