पुणे शहर मनसे कडून पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा भ्रष्टाचाराविरुद्ध शहर अध्यक्ष् साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाने तीव्र आंदोलन
विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून कोरेगाव पार्क परिसरातील जमिनीमध्ये झालेल्या प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज भव्य आणि तीव्र आंदोलन करण्यात आले.
जनतेच्या मालकीची जमीन बेकायदेशीर पद्धतीने हस्तगत करणाऱ्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.जमीन घोटाळा करणाऱ्या पार्थ पवार यांचा पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले
“भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधितांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सरकारी सत्तेचा गैरवापर आणि जनतेच्या विश्वासाशी केलेली विश्वासघातकी वागणूक मनसेकडून सहन केली जाणार नाही. या सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करून पुढे उच्च्य न्यायालत जाऊन कायदेशीर लढाई लढण्याची तयारी करण्यात येणार असल्याचे मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले.
या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.





























