रप्पाटा’ चित्रपटाच्या नायकाची ‘समर्थ’ भरारी ; कोल्हापुरात व्यसनमुक्ती आणि आरोग्यक्रांतीचा जागर.!


‘रप्पाटा’ चित्रपटाच्या नायकाची ‘समर्थ’ भरारी; कोल्हापुरात व्यसनमुक्ती आणि आरोग्यक्रांतीचा जागर!

 

कोल्हापूर: मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला चित्रपट ‘रप्पाटा’ मधील मुख्य भूमिकेतील अभिनेते महमदरफिक मांगुरे सर यांनी नुकतीच कोल्हापूर येथील समर्थ आरोग्य फाउंडेशन आणि नुट्रीफील हेल्थ प्रा. लिमिटेड या संस्थेला सदिच्छा भेट दिली. संपूर्ण भारत आणि जगातील २० देशांमध्ये मधुमेहमुक्ती आणि व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या या संस्थेची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी घेतली.

यावेळी संस्थेचे संस्थापक मा. श्री. सादिक शेख  यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. ‘रप्पाटा’ चित्रपटाच्या माध्यमातून मांगुरे सरांनी तरुणाईला शिक्षणाचे महत्त्व सांगून व्यसनमुक्तीचा जो प्रभावी संदेश दिला, त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी बोलताना मांगुरे सर म्हणाले की, “आजच्या काळात तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवणे आणि देशाला मधुमेहमुक्त करणे ही काळाची गरज असून, सादिक शेख आणि त्यांची टीम हे कार्य अत्यंत निष्ठेने करत आहे.” या भेटीदरम्यान संस्थेचे पदाधिकारी डॉ. सलीम आळतेकर सर, अनिस जमादार सर आणि मुद्दसर शेख सर उपस्थित होते.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!