स्तंभवार सम्राट अशोक स्तंभ, सत्यमेव जयते,राजमुद्रा असा उल्लेख करणे व भारतीय संविधानाची प्रास्ताविका मार्बल मध्ये ठळक प्रथम दर्शनी भागात उभारण्यात यावी.. फिरोज मुल्ला (सर)
पुणे.. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)या पक्षाच्या वतीने फिरोज मुल्ला (सर) प्रदेश मुख्य संघटक यांच्या नेतृत्वाखाली व राहुल वडमारे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर यांच्या उपस्थित मध्ये पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी साहेब यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारलेल्या स्तंभवार सम्राट अशोक स्तंभ, सत्य मेव जयते, राजमुद्रा असा उल्लेख करण्यात यावा व संविधानाची प्रास्ताविका मार्बल मध्ये ठळक स्वरूपात प्रथम दर्शनी भागात उभारण्यात यावी यासाठी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयला लेखी पत्र देण्यात आले आहे परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील कडेच्या भिंतीवर संविधानाची पाटी लावण्यात आली आहे ती ठळक दिसत सुद्धा नाही त्यामुळे संविधानाचा प्रचार प्रसार होत नाही ही बाब फार निंदनीय आहे म्हणून 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आमच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन उभे करू असा इशारा फिरोज मुल्ला (सर )यांनी निवेदन देताना दिला































