सतनाम वाहे गुरु सतनाम वाहे गुरु नामच्या घोषणाने देहूरोड गुरुद्वार परिसर दुमदुमून गेले 


सतनाम वाहे गुरु सतनाम वाहे गुरु नामच्या घोषणाने देहूरोड गुरुद्वार परिसर दुमदुमून गेले 

हजारो शीख बांधवांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात गुरुदेव गुरु नानाक यांची 356 वी प्रकाश वर्ष जयंती साजरी झाली. –

देहुरोड दि :- देहूरोड गुरु सिंग सभा गुरुद्वारा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पासून गुरुद्वारा गुरुद्वारात साहेब गुरु ग्रंथाचे अखंड पाठ व पहाटे पासून भजन म्हणत गुरुद्वारा ते देहूरोड शहरातून प्रभात फेरी काढण्यात आल्या त्या प्रभात फेरीत अखंड पाठची समाप्ती आज सकाळी सात वाजता गुरुद्वारात झाली या प्रकाश वर्ष जयंती निमित्त ३, ४ नोव्हेंबरला सकाळी ६:३० ते सकाळी ७:३० ते १:०० या वेळेत कीर्तनकार ज्ञानी सोहन सिंग यांचे कीर्तन व संध्याकाळी ६:३० ते ७:०० या वेळेत सोडर रेहदास साहेब जी ७:००ते ७:४५ यावेळेत ज्ञानी सोहन सिंग यांचे कीर्तन रात्री ७:४५ ते ९:३० या वेळेत जाथा प्रेसिंदर सिंग ची रात्री १:३०ते ९:४५ या वेळेत कीर्तन झाले आज ५ नोव्हेंबर सकाळी ७:३० ते अखंड पाचची समाप्ती झाली सकाळी ८:०० ते ६:३० या वेळेत ज्ञानी सोहन सिंग यांचे कीर्तन सकाळी १०:०० ते १०:३० दरम्यान ज्ञानी हरभजन सिंगचे वडगाव वाले यांचे दुपारी १२:३० ते २:१५ वेळेत प्रितिंदर सिंगची यांचे कीर्तन झाले. सायंकाळी ६:३० ते ७:०० या वेळेत रेहरास साहेब तर ७:०० ते १:४५ या दरम्यान ज्ञानी सोहन सिंग यांचे कीर्तन झाले. रात्री ९:०० ते ९:३० या वेळात मुलांचा कार्यक्रम रात्री ९:३० ते रात्र १०:०० या वेळेत भाई मनजीत सिंग यांचे कीर्तनाने जयंती उत्सवाची सांगता झाली. गुरु नानक जयंती निमित्त देहूरोड गुरुद्वार परिसर शिख बांधवांच्या गर्दीने फुलून गेला होता.

पहाटेपासून सायंकाळपर्यंत दर्शनासाठी सिख बांधवांची रांग लागली होती. गुरुनानक जयंती निमित्त मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरू सिंग सभा गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले व शेख बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या गुरु सिंग सभा गुरुद्वाराचे अध्यक्ष गुरुमित रत्तू यांनी खासदार बारणे व मान्यवरांचे उपस्थित कीर्तनकाराचे सन्मान केला. दुपारी गुरु लंगर या अन्नप्रसादाचा हजारो शिख बांधवासह व सर्व धर्मीय भाविकांनी अन्ना प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी देहुरोड शहरातील सामाजिक धार्मिक संघटनाचे व राजकीय नेत्यांनी ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!