पुणे येथील गोल्डन ज्युबिली संस्थेचे चेअरमन शाहिद इनामदार यांचे  आकस्मिक निधन


पुणे: शहरातील नामांकित ‘गोल्डन ज्युबिली’ संस्थेचे चेअरमन शाहिद इनामदार यांचे आज तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कौटुंबिक वादातून उद्भवलेल्या तणावामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद इनामदार यांचा त्यांच्या पुतण्यांसोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज पुन्हा एकदा या वादाने तोंड वर काढले. वादाचे रूपांतर गंभीर वादात झाले असतानाच, इनामदार यांना अचानक छातीत वेदना सुरू झाल्या आणि तीव्र हृदयविकाराचा झटका आला. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने मदत देण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेबाबत त्यांची मेव्हणी शाहेदा नासीर खान यांनी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात असलेल्या तणावामुळेच आजचा हा प्रसंग ओढवल्याचे सांगण्यात येत आहे. शाहिद इनामदार यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!