आर एम हायस्कूल मिरज येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ


आर एम हायस्कूल मिरज येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

 

सांगली जिल्हा प्रतिनिधी : अशोक मासाळ

दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित आर एम हायस्कूल व आदर्श विद्यालयात दिनांक 20 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन गुरुवार दिनांक सकाळी नऊ वाजता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मिलिंद जाधव सर व कुमारी शिवानी जाधव मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम व आर एम स्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भातमारे सर उपस्थित होते.

या क्रीडा स्पर्धा मध्ये धावणे, लांब उडी ,उंच उडी, कबड्डी ,खो-खो ,रिले, स्लो सायकल, व इतर विविध मैदानी खेळांचा समावेश असून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी नोंदवला आहे.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष म्हणाले या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त संघभावना आत्मविश्वास खेळाडू वृत्ती विकसित होण्यास मदत होत असून संपूर्ण शाळा परिसरात उत्साही वातावरण पसरले होते त्यामुळे मी शिक्षकांना आव्हान करतो की प्रत्येक तीन महिन्याने शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा घ्याव्यात व मुलांना खेळाचा आनंद द्यावा या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!