कौसरबाग मध्ये लूकमान खान यांच्या स्वागताचा जणू तोफखानाच कडाडला ! ‘मुस्लिम बँके’च्या सिंहाचा शाही थाटात सत्कार!

पुणे | अहो, याला म्हणतात जनसामान्यांचा नेता , ‘मुस्लिम बँक’ या बलाढ्य संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी जनाब लूकमान खान यांची निवड काय होते आणि अवघ्या कौसरबागमध्ये आनंदाचा जणू पूर काय येतो… कालचा तो सोहळा म्हणजे निव्वळ सत्कार नव्हता, तर ते एका धगधगत्या नेतृत्वाचे केलेले शाही स्वागत होते.

शेर सिक्युरिटी सोल्युशन्सचे सर्वेसर्वा मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांच्या कार्यालयात काल हा सत्कार सोहळा पार पडला. पण गर्दीचा तो महासागर आणि लोकांचा तो उत्साह पाहिला की कुणालाही वाटेल, कौसरबागच्या मातीतून आज पुन्हा एकदा निष्ठेचा हुंकार घुमतोय! लूकमान खान साहेब कार्यालयात आले आणि गुलाबांच्या पाकळ्यांनी आसमंत असा काही भरून गेला की, जणू आकाशातून फुलांचा पाऊसच पडतोय! ‘गुलपोशी’चा तो दिमाख पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भागातील अस्सल हिरे जमले होते. अब्दुल वहाब शेख, अबरार सय्यद, मशकुर शेख, साबिर शेख, बद्रुद्दीन शेख, सादिक लुकाडे, उमर शरीफ, अॅड. अझहर खान यांसारखी मातब्बर मंडळी आणि ज्यांनी या सोहळ्याचे अतिशय शिस्तबद्ध आणि देखणे नियोजन केले, ते बबलू सय्यद यांच्या उपस्थितीने सोहळ्याची रंगत अधिकच वाढली.
आजच्या या ‘सूट-बुटातल्या’ जगातही लूकमान खान साहेबांसारखा जमिनीवरचा माणूस जेव्हा मोठ्या पदावर बसतो, तेव्हा सामान्यांच्या आशा पल्लवित होतात. मुस्लिम बँकेच्या माध्यमातून आता प्रगतीची नवी शिखरे सर केली जातील, असा ठाम विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. कौसरबागच्या घराघरातून लूकमान साहेबांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कर्तृत्वाला जेव्हा कष्टाची जोड मिळते, तेव्हा असा ‘शाही’ सोहळा घडतो, हेच काल पुन्हा एकदा सिद्ध झाले! लूकमान खान साहेबांना त्यांच्या या नव्या झळाळत्या प्रवासासाठी आमचे लाख लाख शुभेच्या ..!





























